पीएनबी घोटाळाप्रकरणी चंदा कोचर आणि शीखा शर्मा यांना समन्स

पीएनबी घोटाळाप्रकरणी चंदा कोचर आणि शीखा शर्मा यांना समन्स

आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर आणि एक्सिस बँकेच्या अध्यक्षा शीखा शर्मा या दोघांनाही तपास यंत्रणांनी नोटिस बजावली आहे.

  • Share this:

06 मार्च : पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आता इतर बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याचीही शक्यता आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर  आणि एक्सिस बँकेच्या अध्यक्षा शीखा शर्मा या दोघांनाही तपास यंत्रणांनी नोटिस बजावली आहे.

स्पेशल फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिसनं दोघींनाही १० दिवसांपूर्वी नोटिस बजावल्याची माहिती आहे. दोघींनाही आज चौकशीसाठी उपस्थित राहायचं होतं. मात्र काही खासगी कारणांनी दोघींनीही हजर राहण्यासाठी 10 दिवसांचा वेळ मागितला आहे.

पतहमीच्या म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या जोरावर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी त्यांच्या नावावरील डायमंड आरएस, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंडस या तीन कंपन्यांसाठी हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक, अॅक्सिस बँकेतून पैसे मिळवले.

या तीन कंपन्यांनी हाँगकाँगमधून माल आयात करण्यासाठी ही लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवली होती. प्रत्यक्षात मात्र 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'साठी आवश्यक रक्कम पंजाब नॅशनल बँकेत भरलीच गेली नव्हती. ही रक्कम थोडीतिडकी नाहीतर तब्बल 11, 500कोटींची होती.

First published: March 6, 2018, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading