मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान', उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

'माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान', उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

'देश हाच धर्म आहे पण कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे'

'देश हाच धर्म आहे पण कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे'

'देश हाच धर्म आहे पण कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे'

मुंबई, 16 ऑक्टोबर : शिवसेनेचे  (shivsena) पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाबाबत विधान केल्यामुळे चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. पण, भाषणाला 24 तास होत नाही तेच, 'माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री (cm) हा बहुमान आहे आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

"प्रबोधन" मधील प्रबोधनकार लेखसंग्रह ग्रंथाच्या प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला.

आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा किती मोठे होते हे कळते. मी काही फार त्यांच्या विचारांचा अभ्यास केला नाही पण त्यांच्या सहवासात शिकलो. प्रबोधनकार कसे कडक शिस्तीचे होते ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. पण मी नातू असल्याने माझ्या वाट्याला सुदैवाने ते आले नाही. त्यावेळी आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी सांगितल्या, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

दसऱ्याच्या दिवशीच हिरावले बहीण-भाऊ; भीषण अपघातात चिमुकल्या भाचीसह तिघांचा अंत

'आपण माणूस म्हणून पहिल्यांदा जन्माला येतो. देश हाच धर्म आहे पण कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

लोकशाहीत मत महत्वाचे आहे पण हिंमत सुद्धा लागते. पूर्वीच्या काळातल्या वाईट चालिरीतीचा विरोधात त्या काळी प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले. माझे आजोबा नास्तिक नव्हते पण ढोंग त्यांना आवडत नव्हते. त्यामुळे ते अशा गोष्टींना सरळ लाथच मारायचे. आमचं शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही', असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुणे: विकृताने महिला डॉक्टरच्या संसारात कालवलं विष; NUDE होण्यास भाग पाडलं अन्..

'प्रबोधनकारांचे ग्रंथ साहित्य देशात सर्व राज्यात पोहचवावे त्यासाठी त्याचे भाषांतर झाले पाहिजे. नवहिंदू प्रकार फार घातक आहे. हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीसारखे होते आहे.  शंभर वर्ष झाल्यानंतर सुद्धा माझ्या हस्ते प्रकाशन होते आहे हे माझ्यासाठी समाधान देणारे आणि भाग्याचे आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

First published: