धक्कादायक : महिलांच्या 'फर्स्ट क्लास'च्या डब्यात तरुणाचं हस्तमैथुन

धक्कादायक : महिलांच्या 'फर्स्ट क्लास'च्या डब्यात तरुणाचं हस्तमैथुन

सर्व महिलांनी धाडस करून त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला पण तो काही बाहेर जात नव्हता. शेवटी या महिलांनी त्याला धक्के मारत बाहेर काढलं.

  • Share this:

मुंबई 29 जुलै : मुंबईतल्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा कायम चर्चेत असतो. त्यावर उपाय केल्याचंही प्रशासनाकडून सांगितलं जातं मात्र ही सुरक्षा तकलादू असल्याचं वारंवार दिसून आलंय. रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एक तरुण हस्तमैथुन करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका तरुणीने त्या युवकाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत पोलिसांना कारवाईची मागणी केलीय.

दोन दिवसांपूर्वी ठाणे स्टेशनजवळ हा प्रकार घडला. त्या तरुणीने ठाण्याहून सीएसटीएम ला जाणारी संध्याकाळची 6.32 ची लोकल पकडली होती. स्थानक सोडून दोन मिनिट होत नाही तोच एक तरुण डब्याच्या गेटजवळ बसलेला त्यांना दिसला. नंतर तो हस्तमैथुन करत असल्याचं त्यांना आढळलं.

धक्कादायक : दुष्काळामुळे मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

हा घाणेरडा प्रकार पाहून डब्यात असलेल्या सर्वच महिला प्रवासी घाबरून गेल्या. नंतर त्यांनी धाडस करून त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला पण तो काही बाहेर जात नव्हता. शेवटी या महिलांनी त्याला धक्के मारत बाहेर काढलं. त्या तरुणीने त्याचा व्हिडिओ ट्विटरवर टाकत रेल्वे तसच मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केलीय.

बर्थ डे पार्टीत शिवसैनिकाची तिक्ष्ण शस्त्राने हत्या, मित्रांनीच केले सपासप वार

लोकल ट्रेन्समध्ये महिलांच्या डब्यांमध्ये रात्री 9 नंतर पोलीस असतात. मात्र आता असे प्रकार सायंकाळीच घडू लागल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या पूर्वीही असे प्रकार मुंबईत अनेकदा घडले आहेत. कधी टॅक्सीमध्ये तर कधी सार्वजनिक ठिकाणीही असे प्रकार आढळल्याने महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्यात येतेय. रेल्वे स्टेशनवर भटके तरुण, गर्दुल्ले यांची गर्दी वाढत असल्याने अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2019 07:25 PM IST

ताज्या बातम्या