मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतला हा भाग बनला सर्वाधिक धोक्याचा, कोरोनाची रुग्ण संख्या गेली तब्बल 308वर

मुंबईतला हा भाग बनला सर्वाधिक धोक्याचा, कोरोनाची रुग्ण संख्या गेली तब्बल 308वर

तर सध्या एकूण 17 हजार 862 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता 18 हजारापेक्षाही कमी झाली आहे.

तर सध्या एकूण 17 हजार 862 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता 18 हजारापेक्षाही कमी झाली आहे.

कोरोनाची साळखी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्यात अजुनतरी यश आलेलं दिसत नाही.

मुंबई 14 एप्रिल: मुंबईतला कोरोनाचा प्रसार काही थांबता थांबेना. अतिशय झपाट्याने या काही भागात कोरोनाचा प्रसार होतोय. त्याची साळखी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्यात अजुनतरी यश आलेलं दिसत नाही. मुंबईतला जी दक्षिण हा वॉर्ड सर्वात जास्त धोकादायक बनला आहे. गेल्या 12 तासांमध्ये तिथे 28 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या वॉर्डमधल्या रुग्णांची संख्या 308वर गेली आहे. जी दक्षिण या वॉर्डमध्ये वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन हे उच्चभ्रू आणि झोपडपट्टी असलेले विभाग येतात. तर इ वॉर्ड म्हणजे भयखळ्यातील रुग्णसंख्या 125 वर गेली आहे. तिथे 5 रुग्ण वाढले. तर डी वॉर्ड म्हणजे ग्रांट रोडची रुग्णसंख्या107वर गेलीय. तिथे10 रुग्णांची वाढ झाली. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळली आहे. धारावीमध्ये आज आणखी नवे 6 रुग्ण आढळले आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज सकाळी धारावीत नवे 6 रुग्ण आढळले आहे. 4 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या नवीन रुग्णासह धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता  55 वर पोहोचली आहे. हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी मागितली या 7 मुद्यांवर तुमची मदत, एकदा नक्की वाचा! दरम्यान, धारावीतील जवळपास पंधरा हजार लोकांची स्क्रीनिंग केली  म्हणजे तपासणी केली गेली आहे. या 15 हजारातून 90 लोकांचे नमुने घेण्यात आले. त्याच्यामध्ये सर्दी ताप खोकला अशी लक्षणं आढळून आलेले आहेत. अशा 90 लोकांचे आज तपासणी अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 90 जणांपैकी 50 ते 60 जण जर पॉझिटिव्ह झाले तर  धारावीमध्ये कम्युनिटी स्प्रेड अर्थात समूह संसर्ग झाला असं म्हणू शकतो.  जर असा अहवाल आला नाहीतर ही आरोग्य प्रशासनासाठी ही दिलासादायक बाब ठरले. आणि त्यानंतर धारावीमध्ये कोरोना व्हायरस कंट्रोल करण्यात आला असे म्हणता येऊ शकेल. देशात कोरोनाच्या वाढत्या फैलावात दिलासादायक बातमी, केरळकरांचं मनापासून अभिनंदन दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे (Covid - 19) 100 जणांचा मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 352 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
First published:

पुढील बातम्या