News18 Lokmat

मुंबईतील दहीहंडी आयोजकांची माघार,यावर्षी ६०-७० टक्के आयोजन रद्द

यासाठी विविध कारणं असली तरी गेल्या काही वर्षात आयोजकांवर लादण्यात आलेले जाचक नियम कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2017 02:02 PM IST

मुंबईतील दहीहंडी आयोजकांची माघार,यावर्षी ६०-७० टक्के आयोजन रद्द

प्रणाली कापसे,मुंबई, 14 आॅगस्ट :  मुंबईतील दहीहंडी आयोजन कायमच सगळ्यांचा उत्साह वाढवणारं असतं. पण यावर्षी या आयोजनावर धक्कादायक असा परिणाम झाला आहे. मुंबईतील आयोजन ६०-७० टक्क्यानं कमी झालंय. यासाठी विविध कारणं असली तरी गेल्या काही वर्षात आयोजकांवर लादण्यात आलेले जाचक नियम कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय.

दहीहंडीच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं अनेक निर्बंध लादले होते. वयाची मर्यादा, थरांची मर्यादा, सुरक्षेचे उपाय यामुळे काही वर्ष हळूहळू आयोजन कमी होतच होतं. पण गेल्या वर्षी झालेली नोटबंदी आणि आता आलेला जीएसटी कर यामुळे ही प्रायोजकांनी हात आखडता घेतलाय. प्रायोजकांच्या कमतरतेमुळे आयोजकांनीही पाय मागे घेतलाय.

मुंबई उपनगरातल्या एकट्या गोरेगाव परिसरातील २२-२५ आयोजकांनी माघार घेतलीय. त्यामुळे मुंबईत हा उत्साह कमी दिसणार आहे. तर दुसरीकडे ठाण्यात मात्र अगदी उलट परिस्थिती दिसतेय. तिथे आयोजनांमध्ये वाढ दिसतेय. शिवाय कोर्टाचे निर्बंध उठल्यामुळे जास्तीत जास्त थर लावण्याची चुरस सुद्धा सुरु होणार आहे. भगवती मैदानावर १० थर लावण्यासाठी चार गोविंदा पथकांनी आपल्या नावाची नोंद केलीय. त्यात जय जवान, माझगाव मंडळाचा समावेश आहे. मुंबईतली सगळी मोठी मंडळं त्यामुळे ठाण्यात ठाण मांडून बसणार आहेत. ज्यामुळे उद्या मुंबईच्या रस्त्यांवर  गोविंदांची गर्दी कमी दिसू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...