• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Exclusive : मुंबईत कोरोनाचा उद्रेक अन् 2800 बेड वापराविनाच धूळखात!

Exclusive : मुंबईत कोरोनाचा उद्रेक अन् 2800 बेड वापराविनाच धूळखात!

मुंबईत दररोज सरासरी 9 हजार बाधित रुग्णांची नोंद होत आहे. एकतर मुंबईत बेडची वानवा आहे.

  • Share this:
मुंबई, 10 एप्रिल: मुंबईत कोरोनाबाधित (Mumbai Corona) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांत 9327 नवीन रुग्ण आढळले आहे.  रुग्णालयांमध्ये कोविड बेड्सची (covid-19 bed availability) कमतरता भासू लागली आहे. विलगीकरणासाठी पण बेड तुलनेत कमी पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुंबईत कोरोनाबाधितांसाठी लागणारे सुमारे अडीच हजार बेड वापराविना तसेच पडून असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत दररोज सरासरी 9 हजार बाधित रुग्णांची नोंद होत आहे. एकतर मुंबईत बेडची वानवा आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना वेळीच बेड मिळत नाही. आयसोलेशन वॉर्डासाठी जागा कमी पडत आहे. अनेक ठिकाणी घरात 4 ते 5 सदस्य पॉझिटिव्ह असताना लोकांना विलगीकरणातही ठेवलं जातं नाहीये. कठीण परिस्थिती असताना ही मुंबईत कोरोना बाधितांसाठी लागणारे सुमारे 2800 बेड वापराविना तसेच पडून आहेत. त्यांचा वापर बीएमसी आणि राज्य सरकार विलगीकरणासाठी का करत नाही?  असा प्रश्न उपस्थित झाला आहे. IPL 2021 : धोनीच्या पदरी पुन्हा निराशा, 6 वर्षात पहिल्यांदाच केला नकोसा विक्रम हे बेड म्हणजे रेल्वे प्रशासनाने रेल्वेचे डब्याचं तयार केलेलं आयसोलेशन वॉर्ड (isolation ward in railway coaches). पश्चिम रेल्वेवर जवळपास 410 कोचेस  तयार आहे. त्याच्यामध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. 410 पैकी 128 डबे मुंबईमध्ये आहेत आणि प्रत्येक डब्याची क्षमता जवळपास 20 बेडची आहे. असे मिळून जवळपास 2560 बेड उपलब्ध  होऊ शकतात. आणि मध्य रेल्वेचे 25 डबे ज्यात 250 बेड उपलब्ध होऊ शकतात. असे एकूण 2800 रेल्वेच्या डब्यातील बेड उपलब्ध होऊ शकतात. जे तयार तर आहेत पण ज्यांचा वापर केला गेला नाहीये. या डब्यात काय काय सुविधा? - रुग्णासाठी बेड - प्रत्येक डब्यात डॉक्टरांसाठी एक केबिन - ऑक्सिजन सिलिंडर लावण्याची सोय - आंघोळीसाठी बाथरूम न्यूज 18 लोकमतचा खुलाशानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी कबुल केलं आहे की, 'रेल्वेची इतके बेड उपलब्ध आहेत हे मला आताच कळलं. पण त्या बाबतीत काय करता येईल मी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी बोलते आणि आम्ही लवकरच याबद्दल निर्णय घेऊ. पण माझं मुंबईकरांना आव्हान आहे की, अमुक-तमुक एक रुग्णालय मिळेपर्यंत वाट बघू नका, जे उपलब्ध आहे त्याचा वापर करा नाहीतर तब्येत बिघडू शकते.' रेल्वचे जनंसपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांचं म्हणणं आहे की, 'पश्चिम रेल्वेवर आमचे जवळपास 410 आयसोलेशन डबे  तयार आहेत. त्याच्यामध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. जवळपास 2500 बेड मुंबईत उपलब्ध होऊ शकतात. राज्य सरकारने जर मागणी केली तर आमचे बेड दोन दिवसात तयार होतील. कारण, फक्त धुवून सॅनिटायझर  करावे लागणार आहेत.  इथे काम करणारा पॅरामेडिकल स्टाफ हा स्थानिक प्रशासनाने द्यायचा आहे, अशी एसओपी ठरलेले आहे. डीआरएम हे त्याचे नोडल ऑफिसर आहेत.'
Published by:sachin Salve
First published: