मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शीतल आमटे-करजगी, आता याचं मी काय करू? वाचा मैत्रिणीची डोळे पाणावणारी भावनिक पोस्ट

शीतल आमटे-करजगी, आता याचं मी काय करू? वाचा मैत्रिणीची डोळे पाणावणारी भावनिक पोस्ट

एक प्रगल्भ व्यक्ती असलेल्या डॉ. शीतल आमटे यांचा जगणं नाकारण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. त्यांच्या संपर्कात असलेले लोक आजही निरनिराळया निमित्तांनी त्यांना फेसबुकवर आठवताना हळवे होतात.

एक प्रगल्भ व्यक्ती असलेल्या डॉ. शीतल आमटे यांचा जगणं नाकारण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. त्यांच्या संपर्कात असलेले लोक आजही निरनिराळया निमित्तांनी त्यांना फेसबुकवर आठवताना हळवे होतात.

एक प्रगल्भ व्यक्ती असलेल्या डॉ. शीतल आमटे यांचा जगणं नाकारण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. त्यांच्या संपर्कात असलेले लोक आजही निरनिराळया निमित्तांनी त्यांना फेसबुकवर आठवताना हळवे होतात.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 डिसेंबर : एखादी व्यक्ती हयात असताना त्याच्याशी मारलेल्या गप्पा, सोबत घेतलेले अनुभव हे सगळं त्याच्या जाण्यानंतर एक निराळाच अर्थ घेऊन आपल्या समोर उभं राहते. विशेषत: ती व्यक्ती आपल्या जवळची असेल तर ही गोष्ट अजूनच गडद रंग घेत मनावर ठसे उमटवत राहते.

सीएनएन न्यूज 18 च्या मुंबई ब्युरो चीफ विनया देशपांडे यांनी दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या शीतल आमटे-करजगी (sheetal amte karajgi) यांना उद्देशून दोनेक तासांपूर्वी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट अनेकांच्या मनाचा ठाव घेते आहे. त्यांनी लिहिलं आहे,

"Sheetal Amte-Karajgi आता याचं काय करू मी? हे लिहितानाही डोळ्यातलं पाणी थांबत नाही. तुझ्या नावाचा हा पुरस्कार घ्यायला तुला येणं शक्य नव्हतं, तर मी आणि माझं पिल्लू गेलो होतो. किती वेळा ठरवलं होतं आपण, भेटलो की हे certificate तुला द्यायचं. आता काय करायचं ग याचं?

शर्विल आणि माझं पिल्लू जवळपास एकाच वयाचे, त्यामुळे मातृत्वाबद्दल आपले विचार, एकंदर काम, संसार, धावपळ, किती गोष्टी!

एकमेकींना पाठवलेले असंख्य hearts, मनमोकळेपणाने केलेली एकमेकींची तारीफ, जणू आधार होतो थोडाफार तरी एकमेकांसाठी!

एकदा तू मला बोलता बोलता म्हणालीस, तुला खूप त्रास होतोय. कुणीतरी तुला त्रास देतायत. मी तुला कारण विचारलं तसं तू पटकन म्हणालीस .

"A woman who is capable, efficient, modern and does not allow corruption"

भिडलं होतं काळजाला. "Capable, efficient woman" असल्याबद्दल त्रास देणारी माणसं कमी नाहीतच ग! घट्ट मिठी मारावीशी वाटली होती तुला त्यावेळी. आपण निर्मळ मनानी काम करत राहायचं! पाय खेचणारे कितीही असले तरी! एकमेकांना आधार देऊन पुढे नेणं अवघड असतं का? पुन्हा मनातले विचार मनात! आपली असंख्य संभाषणे - गोधड्या बिझनेस कसा वाढवावा, माझी काही मदत होऊ शकते का? तुझी तळमळ... सगळं सगळं अगदी कालपर्यंत होतं ना गं??!!

This is not fair, Sheetal. हे सगळं किती वरवरचं आणि पोकळ होतं, असं वाटायला लागलं आहे मला.  आयुष्याचा, मैत्रीचा अर्थ कशात? अजूनही मन मानायला तयार नाही. काय म्हणू? I love you, मैत्रिणी!"

नर्गिस दत्त फाऊंडेशननं डॉ. शीतल आमटे-करजगी यांना एक मानपत्र देत त्यांचा गौरव केला होता. मात्र, या सोहळ्याला उपस्थित राहणं डॉ. शीतल यांना शक्य नव्हते. त्यांचे मानपत्र स्वीकारण्यास त्यांची मैत्रिण विनया या गेल्या. आज ते मानपत्र शेअर करत विनया यांनी एक भावपूर्ण फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यांच्या या पोस्टवर अनेकांनी हळहळ व्यक्त करणाऱ्या कमेंट्स लिहिल्या आहेत.

कोण होत्या शीतल आमटे?

जीवनदायी समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवन इथल्या महारोगी सेवा समितीच्या सीइओ डॉ. शीतल आमटे करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या असलेल्या डॉ. शीतल आमटे एक तरुण आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून ओळखल्या जात. बाबा आमटे यांनी आमटे कुटुंबाला दिलेला वसा त्यांनी समर्थपणे पेलला होता. आनंदवनाच्या अनेकानेक उपक्रमांची सुरवात शीतल यांनी केली. शिस्त आणि प्रयोगशीलता यांच्या संगम असलेली कार्यशैली त्यांच्याकडे होती. त्यांनी फोटोग्राफीचाही छंद जोपासला होता.

First published:

Tags: Facebook