मालाडमध्ये तर फेरीवाल्यांनी स्वसंरक्षण केलं,संजय निरुपमांचं समर्थन

मालाडमध्ये तर फेरीवाल्यांनी स्वसंरक्षण केलं,संजय निरुपमांचं समर्थन

आज मालाडमध्ये जे घडलं त्यात फेरीवाल्यांनी आपलं स्वसंरक्षण केलंय असं म्हणत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्याचं उघड समर्थन केलंय.

  • Share this:

28 आॅक्टोबर : मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात हिंसक आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे आज मालाडमध्ये जे घडलं त्यात फेरीवाल्यांनी आपलं स्वसंरक्षण केलंय असं म्हणत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्याचं उघड समर्थन केलंय.

रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले मुक्त करण्यासाठी मनसेनं आपल्या स्टाईलने कारवाई सुरू केलीये. अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहे. मनसेच्या या कार्यवाही विरोधात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला तर फेरीवालेही मारतील अशी उघड धमकी निरुपम यांनी दिली होती. अखेर आज याचे पडसाद मालाडमध्ये उमटले.

मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे याला जबर मारहाण केलीये. या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

मात्र, संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची पुन्हा बाजू घेतलीये.

मनसे हल्ल्यांकडून फेरीवाल्यांचं रक्षण करण्यास पोलीस असमर्थ आहे. त्यामुळे फेरीवाल्यांनी आज स्वसंरक्षण केलं आहे असं निरुपम यांनी म्हटलं. एवढंच नाहीतर मी हिंसेच्या विरोधात आहे असंही सांगायला ते विसरले नाही.

तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून फेरीवाल्यांना संरक्षण द्यावं अशी मागणीही निरुपमांनी केली.

First published: October 28, 2017, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading