मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Maharashtra Lockdown: राज्यात 15 दिवस निर्बंध वाढवले, 'या' जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद

Maharashtra Lockdown: राज्यात 15 दिवस निर्बंध वाढवले, 'या' जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद

ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर (Corona positivity rate) 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथे जिल्हाबंदीचे नियम शिथील होण्याची शक्यता आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर (Corona positivity rate) 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथे जिल्हाबंदीचे नियम शिथील होण्याची शक्यता आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर (Corona positivity rate) 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथे जिल्हाबंदीचे नियम शिथील होण्याची शक्यता आहे.

मुंबई, 30 मे : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकार (Maharashtra Government)कडून निर्बंध आणखीन 15 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या घटत असली तरी काही जिल्हे अद्यापही रेड झोन (Red Zone)मध्ये आहेत. यावरून पॉझिटीव्हीटी रेटनुसार जिल्हाबंदीसाठी वेगवेगळे नियम लागू होणार आहेत, असे राज्य सरकारकडून दिलेल्या माहितीवरून दिसत आहे.

जिल्हाबंदी बाबत काय निर्णय?

ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत कोरोना पॉझिटीव्हीटी (Corona positivity rate) दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021 ब्रेक द चेन आदेशातील निर्बंधांप्रमाणे कडक निर्बंध लागू असणार आहेत.

म्हणजेच अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. म्हणजेच कडक जिल्हाबंदी असेल आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथे जिल्हाबंदीचे नियम शिथील होण्याची शक्यता आहे.

हे वाचा -राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; नवे नियम जाहीर, पाहा काय सुरू आणि काय बंद?

पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे 2021 चे ब्रेक द चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus