आजही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 3721 जणांची विक्रमी वाढ, वाचा 24 तासांमधल्या सर्व Updates

आजही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 3721 जणांची विक्रमी वाढ, वाचा 24 तासांमधल्या सर्व Updates

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढण्याची भीती मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई 21 जून : राज्यात (Maharashtra) आजही तब्बल 3721 नव्या Covid-19 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 1,35,796वर गेली आहे. आज 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे राज्यातल्या एकूण मृत्यूंची संख्या 6283 झाली आहे. तर 1962 रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढण्याची भीती मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिसांवर (Maharashtra Police) कोरोनाचं संकट अधिक गडद झालं आहे. गेल्या 24 तासांमध्ये आणखी 55 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 4,103 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं आहे. शनिवारी तब्बल 88 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं होतं. तर आत्तापर्यंत 3000 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचे (COVID19) रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आता पावसाळा लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यासाठी महापालिकेने (BMC) एक Rapid Action Plan तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता असून त्यासाठी तयारी सुरू केल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी दिली आहे.

7 वॉर्डात रुग्णवाढीचा आकडा जास्त आहे त्यामुळे तिथे आता मिशन झिरो हा Rapid Action Plan  तयार केला आहे.

उच्चभ्रू वस्तीतील लोकांना आम्ही जबाबदारीने वागायला सांगितलं आहे. करण हाऊस हेल्पर आणि ड्रायव्हरही पॉझिटिव्ह निघाले आहेत. लोकांनी मास्क घालूनच बाहेर पडावं असं आवाहनही त्यांनी केलं.

कोरोनाचा धोका! झोपडपट्टी नाही तर आता बहुमजली इमारतींनी वाढवली चिंता

महापालिकेकडे पुरेसे बेड आहेत. भविष्यात कुणाला बेड्स मिळणार नाही असं होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

धारावी वरळीनंतर आता मुंबईमध्ये सात वॉर्ड नवीन हॉटस्पॉट म्हणून आयडेंटिफाय करण्यात आलेत आणि या नवीन हॉट सपॉट मध्ये आता रॅपिड Action प्लॅन पूर्णपणे लागू केला जाणार आहे. म्हणजेच मिशन झिरो याअंतर्गत इथे नवीन रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे त्यासाठी 50 फिरते दवाखाने या वॉर्डमध्ये करोना रुग्णांची तपासणी करणार आहेत त्यांचे स्वाब टेस्टही केली इथे जाणार आहे.

धक्कादायक! तब्बल 7 तास कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह होता घरात

तर देशात गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 821 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 22, 2020, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading