मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

maharashtra corona case : राज्यात कोरोना विस्फोट,आजही रुग्णांची संख्या 58 हजार पार!

maharashtra corona case : राज्यात कोरोना विस्फोट,आजही रुग्णांची संख्या 58 हजार पार!

 गेल्या 24 तासांमध्ये 58,924  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजारांच्या पुढेच आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजारांच्या पुढेच आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजारांच्या पुढेच आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 19 एप्रिल : राज्यात कोरोनाची (maharashtra corona case) दुसरी लाट आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आजही राज्यात कोरोनाबाधित (corona patient) रुग्णांची संख्या 50 हजार पोहोचली आहे. मागील 24 तासांत 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर 351 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची राज्यातील आकडेवारी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. आज 52,412 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 31,59,240 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.04 एवढे झाले आहे.

आजारी मुलाला जपानमधून आणण्यासाठी हवेत सव्वा कोटी; वडिलांनी मोदींकडे मागितली मदत

तर गेल्या 24 तासांमध्ये 58,924  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजारांच्या पुढेच आहे. रविवारी हीच संख्या 60 हजारांच्या पुढे गेली होती. तर आज 351 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,40,75,811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 38,98,262 (16.19 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 37,43,968 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 27,081 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर आज एकूण 6,76,520 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आता 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळणार CORONA VACCINE!

दरम्यान, आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस (above 18 years to be eligible to get COVID-19 vaccine) दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे, 2021 पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे.

काय आहे सेक्स सरोगेट? इस्त्रायली जखमी जवानांना सरकारी खर्चातून दिली जाते थेरपी

देशात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसारच टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जातं आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. केंद्र सरकारने लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला. त्यानंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ आणि इतर आजार असलेल्या 45 पेक्षा जास्त वयांच्या नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्वच नागरिकांना कोरोना लस देणं सुरू झालं. आता 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोनाची लस दिली जाणार आहे.

First published:

Tags: Maharashtra News