धुरामुळे हात सुटला, आई गेली आणि मुलगी वाचली

धुरामुळे हात सुटला, आई गेली आणि मुलगी वाचली

प्रीती राजगरीया वय वर्षे ४३ काल रात्री आपल्या रुची या मुलीसह हाॅटेल मोजोमध्ये आली होती. जशी आग लागली तशी या माय लेकींनी एकमेकांचा हात धरून पळण्याचा प्रयत्न केला. पण गर्दी आणि धुरामुळे त्यांचा हात सुटला आणि रुचीला बाहेर पडण्यात यश आलं.

 • Share this:

29 डिसेंबर : लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत गुदमरून 1४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14हून अधिक जण जखमी आहेत, अशी माहिती केईएम प्रशासनानं दिली आहे.

प्रीती राजगरीया वय वर्षे ४३ काल रात्री आपल्या रुची या मुलीसह हाॅटेल मोजोमध्ये आली होती. जशी आग लागली तशी या माय लेकींनी एकमेकांचा हात धरून पळण्याचा प्रयत्न केला. पण गर्दी आणि धुरामुळे त्यांचा हात सुटला आणि रुचीला  बाहेर पडण्यात यश आलं. मात्र प्रिती आतमध्ये अडकल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती त्यांचा भाऊ अजय अग्रवालने दिली आहे.

सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विश्वा ललानी हा भाऊ धैर्य ललानी आणि आत्या प्रमिला केनिया यांना पार्टीनिमित्त सोबत घेऊन हॉटेल मोजोमध्ये गेला आणि काळानं त्यांच्यावर घाला घातला. आग लागल्याचं समजताच विश्वा ललानी आणि धैर्य ललानी लागलीच हॉटेलच्या बाहेर आले. परंतु आत त्यांची आत्या प्रमिला केनिया अडकल्याचं समजताच पुन्हा त्यांनी हॉटेल मोजोमध्ये प्रवेश केला.आत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या दोन्ही भावांना प्राण गमवावे लागले. महिन्याभराची सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेहून मुंबईत आलेल्या धैर्यचा प्रवास मोजो हॉटेलमध्येच संपला.

आग भडकल्यानंतर प्रत्येकजण स्वत:चा जीव  वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटला. एकच गोंधळ सुरु झाल्याने सुरक्षित जागा शोधताना महिला पुरुषांच्या वॉशरुममध्ये घुसल्या. तिथे खेळती हवा  नसल्याने नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरुन मृत्यू झाला.

 • या भीषण आगीत मृत्यू पावलेल्यांची नावं

  प्रीती राजानी,

  तेजल गांधी,

  कविता धोरानी,

  किंजल शहा,

  प्रमिला केनिया,

  शेफाली जोशी,

  पारुल,

  खुशबू,

  मनीषा शहा,

  प्राची शहा,

  प्राची खेतान,

  सरबजित परेडा,

  धैर्य ललानी,

  विश्व ललानी

First published: December 29, 2017, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading