13 कंडोममध्ये ड्रग्स भरून लपवले होते प्राईव्हट पार्टमध्ये, पण अधिकाऱ्यांनी अखेर पकडलंच!

13 कंडोममध्ये ड्रग्स भरून लपवले होते प्राईव्हट पार्टमध्ये, पण अधिकाऱ्यांनी अखेर पकडलंच!

या महिलेच्या शरिरातून एकूण 1.385 किलोग्राम कोकेन जप्त करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंगळुरूच्या केपगौडा विमानतळावर एक महिला आणि पुरुषाला अमली पदार्थ तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी वापरलेली पद्धत पाहून विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारीही चक्रावून गेले होते.

मुंबई विमानतळावर ब्राझिलच्या साओ पाऊलो इथून आलेल्या एका पर्यटकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेव्हा या व्यक्तीची चौकशी केली होती. तेव्हा त्यांना धक्काच बसला. या पर्यटकाने कंडोमध्ये ड्रग्स भरून आणले होते. या पर्यटकाने ड्रग्सने भरलेले कंडोम गुप्तांगात लपवून ठेवले होते. या पर्यटकाने एक नव्हे तर तब्बल 13 कंडोम लपवून ठेवले होते. यात 312 ग्राम कोकेन होतं. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या पर्यटकाला हेरलं आणि ताब्यात घेतलं.

तर कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरही एका महिलेला अटक करण्यात आली. या महिलेनंही आपल्या प्राईव्ह पार्ट आणि शरिरात मोठ्या प्रमाणात कोकेन लपवून ठेवले होते.

या महिलेच्या शरिरातून एकूण 1.385 किलोग्राम कोकेन जप्त करण्यात आलं आहे. हे कोकेन काढण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागला होता. यासाठी तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

अटक करण्यात आलेली परदेशी महिला ही ग्वाटेमाला (Guatemala) इथं राहणारी आहे. 150 कॅप्सुलमध्ये कोकेन भरलेलं होतं, त्यानंतर या कॅप्सुल तिने गिळले होते.

तसंच या महिलेनं एक मोठे कॅप्सूल आपल्या शरिरातील विविध अंगात लपवून ठेवले होते. तर काही कॅप्सूल हे प्राईव्ह पार्टमध्ये लपवले होते.

परंतु, ही महिला बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय बळावला आणि तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि हा सगळा प्रकार समोर आला.

First published: March 7, 2020, 8:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading