मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ख्रिसमस आणि New Year Celebration साठी महापालिका लवकरच नवीन नियमावली?

ख्रिसमस आणि New Year Celebration साठी महापालिका लवकरच नवीन नियमावली?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackert) यांनी रात्रीची संचारबंदी (Night curfew) आणि पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची गरज नाही, असं स्पष्ट केलं आहे. परंतु याबाबतची नियमावली महापालिकेनं (Municipal corporation \) अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 डिसेंबर : नवं वर्ष  (new year celebration 2021) आणि नाताळ (christmas 2020) सण उत्सहात साजरा करण्यासाठी राज्यात सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. मात्र, राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होण्याची चर्चा होती. त्यामुळं यावर्षी नवीन वर्ष साजरं करता येईल की नाही? याबद्दल संदिग्धता होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackert) यांनी रात्रीची संचारबंदी (Night curfew) आणि पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची गरज नाही, असं स्पष्ट केलं आहे. परंतु याबाबतची नियमावली (guidelines in mumbai 2020) अद्याप जाहीर करण्यात आली नाही. यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यास स्पष्ट नकार दिला होता. 'काही जणांनी रात्रीची संचारबंदी आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यास सांगितलं आहे. पण मला वाटत नाही की, रात्रीची संचारबंदी आणि लॉकडाउन पुन्हा लागू करण्याची गरज नाही' अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्यास नकार दिला होता. 'याचं कारण, आपल्याला अनुभवातून शहाणपण आले आहे.  रात्रीची संचारबंदी लावायची असेल तर लावू शकतो. लॉकडाउन लावायचा असेल तर लावू शकतो. पण सध्या अनेक जण 70 ते 75 टक्के लोकं हे मास्क घालून फिरत आहे. इतरही लोकांनी बंधनं पाळणे गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून इतर लोकांना कोरोनाचा धोका होऊ शकतो. आजारापेक्षा आपण काळजी घेतलेली बरी आहे.  त्यामुळे मास्क हे सार्वजनिक ठिकाणी वापरावेच लागणार आहे. नवी वर्षांचे स्वागत करत असताना सावध राहा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं होत. त्यामुळं नवं वर्ष आणि नाताळ या सणांसाठी राज्यात रात्रीची संचार बंदी किंवा लॉकडाऊन लागू केलं जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होतंय की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका काय पावलं उचलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. तसेच महापालिका लवकरच याबाबतची नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: New year

पुढील बातम्या