माधवी जुवेकरवर बेस्ट कर्मचाऱ्यांनी उधळल्या नोटा, व्हिडिओ व्हायरल

माधवी जुवेकरवर बेस्ट कर्मचाऱ्यांनी उधळल्या नोटा, व्हिडिओ व्हायरल

बेस्टच्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही घटना घडलीय. या कार्यक्रमात माधवीने केलेल्या आक्षेपार्ह डान्सबद्दल संताप व्यक्त होतोय.

  • Share this:

08 नोव्हेंबर : अभिनेत्री माधवी जुवेकर हिचा नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात माधवी ही एका महिलेसोबत डान्स करताना दिसतीये. बेस्टच्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ही घटना घडलीय. कॉमेडी एक्सप्रेस आणि अनेक नाटकांमध्ये काम केलेली माधवी ही बेस्टमध्ये कामाला आहे.

बेस्टच्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही घटना घडलीय. या कार्यक्रमात माधवीने केलेल्या आक्षेपार्ह डान्सबद्दल संताप व्यक्त होतोय. एकीकडे पगार वेळेत मिळत नाही अशी तक्रार बेस्ट कर्मचाऱ्यांकडून केली जात असताना हा व्हिडिओ समोर आल्याने त्याबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 05:33 PM IST

ताज्या बातम्या