आदर्श प्रकरणी कारवाईला कोर्टाची स्थगिती

आदर्श प्रकरणी कारवाईला कोर्टाची स्थगिती

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या परवानगीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलंय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 15 जून : आदर्श प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टातील कारवाईला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलीये. मुंबई उच्च न्यायालयाने ही स्थगिती दिलीये. तसंच २१ जूनपासून या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू होणारेय.

गेल्या सुनावणीला आदर्श प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी करण्याचे आदेश हे जस्टीस जे ए पाटील कमिटीच्या अहवालानुसार दिले होते असं स्पष्टीकरण राज्य सरकरच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आलं होतं. आदर्श प्रकरणाची चौकशी करणाऱ्या या समितीच्या अहवालानुसार अशोक चव्हाणांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याची बाब समोर आली होती. त्यानुसार राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी अशोक चव्हाणांच्या चौकशीचे आदेश दिले होते. असं राज्य सरकारच्या वतीनं दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं.

आदर्श प्रकरणात अचानक अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी का दिली गेली? असा सवाल मुंबई उच्च न्यायलयानं राज्य सरकारला विचारला होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या परवानगीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलंय. त्याचबरोबर आदर्श खटल्यातून व आरोपींच्या यादीतून त्यांचं नाव वगळण्यात यावं अशी मागणी आपल्या याचिकेत केलीये.

अशोक चव्हाणांचा दावा आहे की, राजकीय वैमनस्यातून त्यांचं नाव या संपूर्ण प्रकरणात गोवण्यात आलंय. आधी राज्यपालांनी त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. मात्र अचानक राज्यपालांनी ती परवानगी देऊ केली. अशी काय परिस्थिती अचानक निर्माण झाली होती? असा सवाल अशोक चव्हाणांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2017 02:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading