मुंबई विमानतळाचा नवा विश्वविक्रम,२४ तासांत ९६९ टेकऑफ आणि लँडिंग

या आधीचा स्वत:चाच 935 विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगचा विक्रम त्यांनी मोडलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2017 03:28 PM IST

मुंबई विमानतळाचा नवा विश्वविक्रम,२४ तासांत ९६९ टेकऑफ आणि लँडिंग

26 नोव्हेंबर : मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं नवा जागतिक विक्रम केलाय. शुक्रवारी 24 तासांमध्ये विमानतळावरून तब्बल 969 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. या आधीचा स्वत:चाच 935 विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगचा विक्रम त्यांनी मोडलाय.

विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी नियमित वाहतूकीसाठी फक्त एकच धावपट्टी वापरली जाते तर दुसरी धावपट्टी इतर कामांसाठी वापरली जाते. दररोज मुंबई विमातळावर 900 विमानांची ये जा होत असते. एकच धावपट्टी असताना विमान वाहतुकीचं व्यवस्थापन करणं हे आव्हानाचं काम आहे. हे काम अधिक सक्षमपणे होण्यासाठी आणखी पायाभूत सुविधांची गरज आहे असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लवकरच हजार विमानांचा टप्पाही पार करू असा विश्वासही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

  • मुंबई विमानतळ सगळ्यात 'बिझी'
  •  मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत जे एकमेकांना क्रॉस करतात..त्यामुळे एका वेळी एकच विमान लँडिंग किंवा टेकऑफ करू शकतं.
  • Loading...

  • वर्दळीच्या वेळी दर पाच मिनिटांना 4 विमानांची वाहतूक होते..2-लँडिंग 2-टेक ऑफ.
  • 2 विमानांच्या वाहतुकीदरम्यान हवाई वाहतूक नियंत्रकाला मिळतात केवळ 65 सेकंद.
  • मुंबई विमानतळावर दररोज दर तासाला 46 विमानं हाताळण्याची क्षमता आहे मात्र प्रत्यक्षात शुक्रवारी सकाळ-संध्याकाळ दर तासाला 50 विमानांचं लँडिंग किंवा टेकऑफ होतं.
  • एक धावपट्टी असलेलं सगळ्यात व्यस्त विमानतळाचा जागतिक रेकॉर्ड यापूर्वीही मुंबईच्याच नावावर होता. गेल्या वर्षी एका दिवसात 837 विमानांची वाहतूक या विमानतळावर करण्यात आली होती. हा रेकॉर्ड आधी लंडनच्या गॅटविक विमानतळाच्या नावावर होता जिथे दिवसाला 747 विमानांची ये-जा होती.
  • याशिवाय प्रवाशांच्या ये-जा च्या आकडेवारीनुसार दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात पहिलं आणि मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2017 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...