मुंबई रेल्वे म्हणजे मृत्यूचा सापळा; 2017मध्ये एकूण 3014 जणांचा अपघाती मृत्यू

मुंबई रेल्वे म्हणजे मृत्यूचा सापळा; 2017मध्ये एकूण 3014 जणांचा अपघाती मृत्यू

मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा आता मृत्यूचा सापळा बनल्याचं समोर आलं आहे. 2017मध्ये मुंबई लोकलच्या अपघातात मृत्यू पावलेल्यांचा आकडा पहिला तर हेच म्हणावे लागेल.

  • Share this:

27 जानेवारी : मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा आता मृत्यूचा सापळा बनल्याचं समोर आलं आहे. 2017मध्ये मुंबई लोकलच्या अपघातात मृत्यू पावलेल्यांचा आकडा पहिला तर हेच म्हणावे लागेल. कारण 2017 या वर्षात लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकूण 3014 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे आणि एकूण 3345 जण जखमी झाले आहेत. रेल्वे पोलिसांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या आकडेवारीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

या अपघातांमध्ये 1651 व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडल्ये आहेत. तर त्यात 1467 पुरुष तर 184 महिलांचा समावेश आहे. 654 जणांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे झाले आहेत. असं पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.

मध्य रेल्वे मार्गावर 2017 या वर्षभरात 1534 जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 1086 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर वर्षभरात 394 जणांनी अपघातात आपले प्राण गमावले आहेत. सीएसटी, दादर, भायखळा, चर्चगेट, अंधेरी, वांन्द्रे, आणि बोरीवली ही स्टेशन्स सर्वात जास्त बळी घेणारी रेल्वे स्टेशन्स बनली आहेत. ही संख्या अजून वाढू न देण्यासाठी प्रवास करताना कोणत्याही प्रकारचे स्टंट करू नका. काळडीपूर्वक प्रवास करा असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

First published: January 27, 2018, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading