लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्या...बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्या...बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणाचे रोजगार गेले आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणाचे रोजगार गेले आहेत. त्यानंतर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

वर्षा येथे परिषद सभागृहात आज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन काळातही विभागामार्फत एक लाख आठ्ठेचाळीस हजार रोजगार उपलब्ध केले आहेत ही चांगली बाब आहे. परंतु लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीत जसे रोजगार निर्माण होतील त्याला अनुसरून प्रशिक्षित तयार करण्याचे काम विभागाने करावे. या साठी सविस्तर असा कृती आराखडा लवकर तयार करण्यात यावा. तसेच ऑन जॉब प्रशिक्षण योजना कार्यान्वित करावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI )नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत.

कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याबाबत विचार करण्यात यावा

प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक रचना स्थानिक परिस्थितीनुसार रोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. समृद्धी महामार्ग लगतच्या जिल्ह्यांत नवीन रोजगार उपलब्ध होतील त्याप्रमाणे प्रशिक्षित तयार करण्याचे नियोजन करावे असे निर्देश ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह यांनी आयुक्तालयामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले.

Published by: Akshay Shitole
First published: November 25, 2020, 7:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading