Home /News /mumbai /

मोठी बातमी : फक्त महिला नाही सगळ्यांसाठी लोकल सुरू होणार? बुधवारी 11 वाजता महत्वाची बैठक

मोठी बातमी : फक्त महिला नाही सगळ्यांसाठी लोकल सुरू होणार? बुधवारी 11 वाजता महत्वाची बैठक

सर्वांसाठी पुन्हा लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामन्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आणण्यात आले. मात्र अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही लोकल सेवा सुरू होत नसल्याने नोकरदारांचे मोठे हाल होत आहेत. तसंच बसमधून प्रवास करावा लागत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वांसाठी पुन्हा लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करत सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्याची घोषणा केलेली असतानाच राज्य सरकारने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. उद्या राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. सर्व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करावी, यासाठी राज्य सरकारने ही बैठक बोलावली आहे. राज्य सरकारचे अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात उद्या होणाऱ्या बैठकीत सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याबाबतची चर्चा होईल. महिला प्रवाशांबाबत जो गोंधळ निर्माण झाला तो टाळण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. महिलांना लोकल सेवेचे मुभा, कसं असेल वेळापत्रक? 'मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती, त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत,' अशी माहिती ट्विटरवरून पियुष गोयल यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या