• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • क्रांती रेडकरने शेअर केला महत्त्वाचा पुरावा; समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांची बोलती होईल बंद

क्रांती रेडकरने शेअर केला महत्त्वाचा पुरावा; समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांची बोलती होईल बंद

आपल्या पतीवर होत असलेल्या आरोपानंतर क्रांती रेडकर सोशल मीडियावर आपली बाजू मांडताना दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan drug case) अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे (kranti redkar) पती आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर (sameer wankhede wife kranti redkar) चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या पतीवर होत असलेल्या आरोपानंतर क्रांती रेडकर सोशल मीडियावर आपली बाजू मांडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रांती रेडकर विविध पद्धतीने आपल्या पतीवर होणाऱ्या टीकांवर प्रत्युत्तर देताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी समीर वानखेडेवर केलेल्या आरोपानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एकदा क्रांती रेडकरने आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न डॉ. शबाना कुरेशी या महिलेसोबत झालं होतं. त्यानंतर त्यांनी कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरं लग्न केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. मात्र समीर वानखेडेंसह त्यांची पत्नी क्रांती रेडकर हिने हा आरोप फेटाळून लावला आहे. तिने केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मी आणि माझे पती समीर वानखेडे जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधी धर्मांतर केलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. समीरचे वडीलदेखील हिंदू होते, त्यांनी कायद्याने एका मुस्लीम महिलेशी लग्न केलं. समीरचं पहिलं लग्न special marriage act अंतर्गत झालं असून घटस्फोट 2016 मध्ये झाला. त्यानंतर hindu marriage act नुसार 2017 मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नाचे काही फोटोही क्रांतीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: