Home /News /mumbai /

शिंदे की फडणवीस? अर्थ आणि गृहखातं नेमकं कोणाकडे? खातेवाटपावरुन दोन्ही गटांत चढाओढ

शिंदे की फडणवीस? अर्थ आणि गृहखातं नेमकं कोणाकडे? खातेवाटपावरुन दोन्ही गटांत चढाओढ

शिंदे सरकारला (Eknath Shinde) 02 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यानंतर ते मंत्रिमंडळ बनवतील. शिंदे सरकारमध्ये शक्तीखाली खात्यांसाठी लॉबिंग सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

    मुंबई, 2 जुलै : अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात आता एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या या गटाला भाजपने बाहेरुन पाठिंबा दिला आहे. दोघांच्या युतीनंतर या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 170 असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यपालांनी शिंदे यांना 2 जुलै रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यानंतर ते मंत्रिमंडळ बनवतील असे मानले जात आहे. ते किती मोठं असेल याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, आता चांगली खाती आपल्याकडे यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. खातेवाटपात शिंदे गटाला हवंय अर्थ आणि गृहखातं : सूत्र नव्या सरकारमध्ये शिंदे गटाला अर्थ आणि गृहखातं आपल्याकडे हवं असल्याची सुत्रांची माहिती आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास आणि गृहखातं राहणार असल्याचं भाजप सुत्र म्हणत आहे. शिंदे यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दिला जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे पूर्वीचेच कृषी तर उदय सामंत यांना शिक्षण विभाग देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, आवाजी मतदान, कारवाईची टांगती तलवार, बंडखोरांचं काय होणार? बच्चू कडू आणि सत्ताधाऱ्यांना बढती प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नेत्यांनी शिंदेयांच्याकडे लॉबिंग केल्याचं सांगितलं जात आहे. किती मोठं मंत्रीमडळ असू शकतं? 91व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम 72 मध्ये 1A च्या नावाने एक नवीन कलम जोडण्यात आले, ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार आणि प्रकार स्पष्ट शब्दात स्पष्ट करण्यात आला आहे. तो केंद्रीय मंत्रिमंडळासाठी 72(1A) सुधारणा कायदा आहे तर राज्यांसाठी कलम 164(1) मध्ये स्पष्ट केला आहे. आता याच आधारावर राज्याचे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ठरवायची आहे. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असल्याने त्यातील 15 टक्के म्हणजे 42. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनते तेव्हा त्यात जास्तीत जास्त 42 जणांनाच मंत्री करता येते. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही सहभाग असणार आहे. 28 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारने शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत 31 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्री होते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या