Home /News /mumbai /

महाराष्ट्रात या आठवड्यात नेमकं काय घडलं? महत्त्वाचे निर्णय आणि घडामोडी फक्त एका क्लिकवर

महाराष्ट्रात या आठवड्यात नेमकं काय घडलं? महत्त्वाचे निर्णय आणि घडामोडी फक्त एका क्लिकवर

शासनाकडून सबंध आठवडाभरात झालेल्या निर्णय आणि घडामोडींची माहिती दिली जाते.

  मुंबई, 2 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटामुळे परिस्थितीचा अंदाज घेत रोज नव-नवे निर्णय घेतले जात आहेत. शासनाकडून सबंध आठवडाभरात झालेल्या निर्णय आणि घडामोडींची माहिती दिली जाते. जाणून घेऊयात २६ जुलै, २०२० ते १ ऑगस्ट, २०२० या कालावधीतील महत्त्वाचे शासन निर्णय आणि घडामोडी यांचा संक्षिप्त आढावा... कोरोना युद्ध २६ जुलै २०२० मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागार्फत आयोजित ऑनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयंम – https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलमार्फत १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार प्राप्त. कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी, या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी. विभागनिहाय तपशील – मुंबई – २४ हजार ५२०, नाशिक ३० हजार १४५, पुणे ३७ हजार ५६२, औरंगाबाद ३५ हजार २४३, अमरावती १४ हजार २६०,नागपूर, ३० हजार ४३५. विभागनिहाय रोजगार तपशील – मुंबई ३ हजार ७२०, नाशिक ४८२, पुणे १० हजार ३१७, औरंगाबाद १ हजार ५६९, अमरावती १ हजार २२, नागपूर २३ उमेदवारांना नोकरी. राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत ५८२ उमेदवारांना रोजगार. मागील ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे, १६७ उद्योजकांचा सहभाग. १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती, ४० हजार २२९ तरुणांचा सहभाग, आतापर्यंत २ हजार १४० तरुणांना रोजगार. ५२ हजार ४३५ स्वस्त धान्य दुकानांमधून १ जुलै ते २५ जुलैपर्यंत १ कोटी ३५ लाख ४८ हजार ६२६ शिधापत्रिका धारकांना ३७ लाख ३ हजार ७९३ क्विंटल अन्नधान्याचे वाटप. 1 ते 25 जुलैदरम्यान 24 लाख 20 हजार 827 गरीब व गरजू लोकांना शिवभोजनचा लाभ. ६०४४ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के, बरे होऊन घरी परतलेले रुग्ण- २ लाख १३ हजार २३८, आज ९४३१ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर उपचार, आज निदान झालेले नवीन रुग्ण ९४३१, मृत्यू- २६७ मृत्यू २७ जुलै २०२० पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या 4 हजार 466 घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील 3670 अर्जदारांना घरांचे ऑनलाइन वाटप, निवारा केंद्र आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित. यावेळी सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रू. 1 कोटीची मदत. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील कोरोना उच्च क्षमता असलेल्या प्रयोगशाळेचे उद्‌घाटन, मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे उपस्थित. ठळक मुद्दे- साथीच्या रोगात प्रतिकार शक्तीचे महत्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करण्याची श्री ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांना विनंती. महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कोरोनासाठी जम्बो सुविधा उभारण्यास सुरुवात, मुंबईत 20 दिवसांमध्ये या सुविधांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती, चेस दि व्हायरस उपक्रम परिणामकारकरीत्या राबविल्याचे चांगले परिणाम. महाराष्ट्रामार्फत देशात मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग सुरू. जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स आणि ग्राम दक्षता समित्या मार्फत कोरोना विषयक जनजागृती. भारतीय वैद्यक संशोधन परिषद (ICMR) मार्फत मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान (NIRRH) येथे केंद्राची उभारणी. सुविधा- High Throughput COVID-19 सुविधा, कोविड विषाणूच्या 1200 चाचण्या प्रत्येक दिवशी 3 पाळ्यांमध्ये शक्य, ग्रुप टेस्टिंग शक्य. राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थान आणि महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे मॉडेल रुरल हेल्थ युनिट स्थापन, डहाणू येथे चाचणी सुविधा सुरू. राज्यात २६६५ कोविड समर्पित आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये, ३ लाख ६ हजार १८० आयसोलेशन बेड्स. ४२ हजार ८१३ ऑक्सिजन बेड्स, ११ हजार ८८२ आयसीयू बेड्स,व्हेंटीलेटर्स-३७४४, पीपीई किट्स- ७ लाख ६ हजार ९११, एन ९५ मास्क-१२ लाख ५९ हजार ३८२ राज्यात प्रथमच आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांच्या जास्त संख्येची नोंद, ८७०६ रुग्णांची घरी रवानगी, ७९२४ नवीन रुग्णांचे निदान,आतापर्यंत बरे झालेले रुग्ण- २ लाख २१ हजार ९४४. रुग्ण बरे प्रमाण ५७.८४ टक्के. सध्या १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू, मृत्यू – २२७ उद्योग विभागामार्फत विकसित महाजॉब्ज ॲप्लिकेशनचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण. 1 जुलै ते 26 जुलैपर्यंत 1 कोटी 37 लाख 70 हजार 554 शिधापत्रिका धारकांना 38 लाख 83 हजार 165 क्विंटल अन्नधान्याचे वाटप. 1 जुलै ते दि. 26 जुलै पर्यंत 25 लाख 11 हजार 804 गरीब व गरजू लोकांना शिवभोजनाचा लाभ. सायबर संदर्भात 564 गुन्हे दाखल, 290 व्यक्तींना अटक. अकरावी – बारावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या काळात नुकसान होऊ नये या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन्स पुणे यांनी संयुक्तरीत्या तयार केलेले इझिटेस्ट ई-लर्निंग ॲप राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले, सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एका वेबिनारद्वारे या ॲपचे उद्‌घाटन. 28 जुलै 2020 महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित स्पर्धेत सहभागी 1 हजार 600 स्टार्टअप्समधून उत्कृष्ट 100 स्टार्टअप्सची कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्यामार्फत घोषणा. या 100 स्टार्टअप्सची माहिती www.msins.in या संकेतस्थळावर उपलब्ध, 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2020 दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात या स्टार्टअप्सचे सादरीकरण. त्यातील उत्कृष्ट 24 स्टार्टअप्सची निवड करुन त्यांना प्रत्येकी 15 लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामांचे कार्यादेश देण्याचा निर्णय. 1 जुलै ते दि. 27 जुलै 26 लाख 9 हजार 164 गरीब व गरजू लोकांना शिवभोजनाचा लाभ. कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी पुढील उपक्रम सुरु- (1) शाळा बंद … पण शिक्षण आहे- या अभ्यासमालेच्या सहाय्याने दीक्षा APP आधारित विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठीचा उपक्रम 3 महिन्यांपासून सुरु. (2)विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिकेचा विकास. (3)जिओ टी.व्हीवर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इ. 3 री ते इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम. (४) जिओ सावन या रेडीओ वाहिनीवर कार्यक्रमाचे प्रसारण. (५ )१00% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा. (६ )यू ट्यूब वाहिनीवर शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चॅनेल सुरु. (६) सह्याद्री वाहिनीवर टीलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम 1 ली ते इ. 8 वी साठी सुरु. (७) शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गूगल क्लासरूमची सुविधा. (८) स्वयंसेवक, शिक्षकांमार्फत वाडी आणि वस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन. कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळल नसून फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्ट. कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 27 जुलैपर्यंत 6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 41 लाख 76 हजार 450 क्विंटल अन्नधान्याचे वाटप. आज १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने बऱ्या झालेल्या रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंतची रुग्ण बरी होण्याची ही सर्वोच्च संख्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण- २ लाख ३२ हजार २७७. आज ७७१७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू. आज नोंद झालेले मृत्यू २८१. पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करण्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे निर्देश. इतर निर्देश- कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण करा. रुग्णांचा शोध घेऊन त्याचे सुरक्षित अलगीकरण व विलगीकरण करा, ससून रुग्णालयासह सर्वच रुग्णालयातील बेडची संख्या वाढवा, व्हेन्टीलेटर्स, आयसीयू आणि संखेत वाढ करा, गरजू रुग्णांना हे बेड उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करा, खाजगी रुग्णालयांच्या गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई सेवा देणारे कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करा. २९ जुलै २०२० मंत्रीमंडळ निर्णय कोव्हिडमध्ये विकासकामांची गती मंदावू नये म्हणून शासकीय कंत्राटदारांसाठी उपाययोजना जाहीर- (1) शासकीय कामाच्या पूर्णत्वासाठी मुदतवाढीची विनंती कंत्राटदाराने केल्यास त्यास दि.15 मार्च, 2020 ते दि.15 सप्टेंबर, 2020 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ. या काळासाठी भाववाढीसंदर्भात कंत्राटातील अटी व शर्ती लागू राहतील. (२) सुरक्षा अनामत रक्कमचालू देयकांमधून वजा करण्यात येते, अशा प्रकरणी चालू देयकांतून करावयाच्या वजावटीचे प्रमाण कमी करुन आणि/ अथवा वजावटीचा कालावधी अधिक देयकांकरीता वाढवणार. चालू देयकांमधून वसूल करावयाच्या सुरक्षा अनामत रकमेची वजावट पूर्ण झाली असल्यास ती रक्कम कंत्राटदारास प्रदान करुन कंत्राटदाराकडून विनाशर्त बँक गॅरंटी (दोष दायित्व निवारण कालावधीपर्यंत) घेण्यात येईल. (३)निविदा रकमेहून कमी रकमेचा देकार प्राप्त होतो म्हणून अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम बँक हमी/डी.डी. घेतली जाण्याच्या प्रकरणी 50 टक्क्याहून अधिक रकमेचे काम पूर्ण झाले असल्यास 50 टक्के अनामत रक्कम हमी/डी.डी. कंत्राटदारास परत. बाकी अनामत रक्कम डी.डी.च्या स्वरुपात असल्यास ती विनाशर्त बँक गॅरंटीच्या मोबदल्यात मुक्त करण्यात येईल. (४) विशेष कंत्राटांमध्ये (उदाहरणार्थ, बांधा-वापरा-हस्तांतरीत करा, ई.पी.सी. मॉडेल) कामगिरीसाठी अनामत रक्कम बँक हमीच्या स्वरुपात घेण्याच्या प्रकरणी 50 टक्क्याहून अधिक रकमेचे काम पूर्ण झाले असल्यास त्याच्या 50 टक्के प्रमाणात अनामत रक्कम (हमीची रक्कम) कंत्राटदारास परत करण्यात येईल. जिल्ह्यांमध्ये कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित निकषास मान्यता. मोठे व विशाल प्रकल्पाचे निकष- (1) आकांक्षित जिल्हे – गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद, हिंगोली- मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक 50 ते 100 कोटी रुपये असल्यास 100 कोटीपेक्षा अधिक अथवा 200 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प. (२) मराठवाडा, विदर्भ, धुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक 50 ते 200 कोटी रुपये असल्यास 200 कोटीपेक्षा अधिक अथवा 300 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प. (३) उर्वरित महाराष्ट्र- मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक 50 ते 250 कोटी रुपये असल्यास 250 कोटीपेक्षा अधिक अथवा 500 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प. राज्य वस्तू व सेवा करावर आधारित प्रोत्साहने (३) आकांक्षित जिल्हे- गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद, हिंगोली -प्रकल्पांना 10 वर्षांसाठी भांडवली गुंतवणुकीच्या मर्यादेत 110 टक्के प्रोत्साहन व औद्योगिक विकास अनुदान 100 टक्के ढोबळ राज्य वस्तु व सेवा कर. (२) मराठवाडा, विदर्भ, धुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग- 10 वर्षांसाठी भांडवली गुंतवणुकीच्या मर्यादेत 100 टक्के प्रोत्साहन व औद्योगिक विकास अनुदान 100 टक्के ढोबळ वस्त व सेवा कर आधारित. (३) उर्वरित महाराष्ट्र- अ/ ब तालुक्याकरिता 50 टक्के, क तालुका- 75 टक्के, ड / ड+ तालुका- 100 टक्के असे 10 वर्षांसाठी भांडवली गुंतवणुकीच्या मर्यादेत प्रोत्साहन, 100 टक्के ढोबळ राज्य वस्तु व सेवा कर आधारित प्रोत्साहन. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क या प्रकल्पास व आशियाई विकास बॅंकेसोबत करार करण्यास मान्यता. फळे आणि भाजीपाल्यांची राज्यात पुढील 5 वर्षांपर्यंत वाढती मागणी तसेच विविध टप्प्यांमध्ये फळ भाजीपाल्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता मॅग्नेट नेटवर्कमधून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न.या प्रकल्पाची सर्व जिल्हयांमध्ये 2020 ते 2026 पर्यंत अंमलबजावणी करण्यास मान्यता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना मंत्रीमंडळ बैठकित सूचना. पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर पर्यंत सुरु ठेवण्याची विनंती प्रधानमंत्र्यांना केल्याचे मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट महाराष्ट्रामधील मृत्युदर 3.62 टक्के इतका कमी, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 27 दिवसांवर. मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवस. दर 10 लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे, मुंबई आणि पुणे या भागातील, कल्याण-डोंबिवली महापालिका, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई या पालिकांमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण. स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळाबाजाराची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी करण्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश. मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलिसांना कोविड-19 प्रादुर्भाव संपेपर्यंत सेवा निवासस्थाने ठेवण्याची मुभा देण्यात आल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना 500 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता, नवीन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. 22 मार्च ते 28 जुलैपर्यंत नुसार 2,14,594 गुन्ह्यांची नोंद, 31,995 व्यक्तींना अटक. अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभाग, यांच्या संयुक्त पथकामार्फत 28 जुलै, 2020 रोजी सतीया न्युट्रास्युटीकल्स (कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे )यांच्या गोदामावर छापा, मे. नेवस लाईफ न्युट्रासायन्स, अहमदाबाद निर्मित मे. ओलेना हेल्थ (ओपीसी) प्रा. लि. 101 ए, पंचरत्न बिल्डींग, ऑपेरा हाऊस, मुंबई यांच्या मार्फत विक्री करण्यात येणाऱ्या ओलेना (1000 मिली ग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्स तसेच में साई प्रो बायोटेक (ता. मुळशी, जि. पुणे) उत्पादीत में सतीया न्युट्रास्युटीकल्स, कोणगाव, (ता. भिवंडी, जि. ठाणे) यांच्या मार्फत विक्री केल्या जाणाऱ्या कार्डीओ (Plix) या अन्न पदार्थाचा साठा, कारवाई करुन जप्त. रुग्ण बरे प्रमाण ५९.८४ टक्के. आज ७४७८ रुग्णांची घरी रवानगी, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ३९ हजार ७५५.आज ९२११ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू २९८. ३० जुलै २०२० कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढ, मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर, मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यास संमती, खेळाडुंचा संघ नसलेल्या आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून संमती. वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत ३९५ विमानांद्वारे ५४ हजार १८० प्रवासी मुंबईत दाखल, यात मुंबईचे प्रवासी- १८ हजार १९२, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी – १८ हजार ५८७ आणि इतर राज्यातील प्रवासी – १७ हजार ४०१ . ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १८ लाख रुपयांची मदत. शेतमजूरांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम, १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट, सध्या कापूस व मका या पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्याने किटकनाशक फवारणीचे प्रशिक्षण प्राधान्याने देण्याचा कार्यक्रम सध्याच्या पीक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सूक्ष्म सिंचन देखभाल दुरूस्ती, रोपवाटीकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी याबाबत शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाची सुविधा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया १ ऑगस्ट, २०२० पासून ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय, संपर्क- https://admission.dvet.gov.in महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ५७० गुन्हे दाखल, २९० व्यक्तींना अटक. ऑक्सीपल्स मीटर संदर्भातील फसव्या व्हाट्सअप संदेशाला बळी पडू नये व सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचे महाराष्ट्र सायबर विभागातर्फे आवाहन. पुणे येथील विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक. महत्वाचे निर्देश– कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय महत्त्वाचा, क्वारंटाईन सुविधांचे व्यवस्थापन आवश्यक, ट्रॅकिंग आणि टेस्टींग मोठ्या प्रमाणात करण्याची गरज, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याबाबत दक्षता आवश्यक. निर्देश– लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करा, कोरोना चाचण्यांचे अहवाल विनाविलंब येण्यासाठी प्रयत्न करा, नागरिकांच्या मनातील भीती दूर करा, रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमा. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने नियोजन करा. आज कोरोनामुक्त झालेल्या ८८६० रुग्णांची घरी रवानगी, बरे झालेले रुग्ण – २ लाख ४८ हजार ६१५. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के. ११,१४७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू. आज नोंद झालेले मृत्यू २६६. ३१ जुलै २०२० आज बरे झालेल्या ७५४३ रुग्णांची घरी रवानगी, आतापर्यंत बरे झालेले रुग्ण – २ लाख ५६ हजार १५८ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के. आज १०,३२० नवीन रुग्णांचे निदान, १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर उपचार सुरु. नोंद झालेले मृत्यू २६५ वंदेभारत अभियानांतर्गत ४०० विमानांनी आतापर्यंत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवासी दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवासी- १८ हजार २६४ उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- १८ हजार ७९८, इतर राज्यातील प्रवासी संख्या १७ हजार ६४५. बकरी ईद निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या जनतेला शुभेच्छा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करण्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांचे आवाहन २२ मार्च ते ३० जुलै पर्यंत कलम १८८ नुसार २ लाख १६ हजार ५७३ गुन्ह्यांची नोंद, ३२ हजार ३६५ व्यक्तींना अटक. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी 44 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्ग आणि 40 खासगी आयटीआयमध्ये 8 हजार 348 जागांसाठी 1 ऑगस्टपासून https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रियेचा प्रारंभ. 1 ऑगस्ट 2020 तळेगावमध्ये 250 एकरवर अद्ययावत इलेक्ट्रॉनिक पार्क, कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची मर्यादा 10 लाखांहून 14 लाख, एमआयडीसीच्या वर्धापनदिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा. 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत 878 शिवभोजन केंद्रातून 30 लाख 3 हजार 474 गरीब व गरजू लोकांना शिवभोजनाचा लाभ. महिना निहाय तपशील- एप्रिल – 24 लाख 99 हजार 257, मे – 33 लाख 84 हजार 40, जून- 30 लाख 96 हजार 232, जुलै- 30 लाख 3 हजार 474, एकूण दि. 1 एप्रिल ते 31 जुलै – 1 कोटी 19 लाख 83 हजार 3. 52 हजार 434 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत 6 कोटी 52 लाख 32 हजार 448 लाभार्थ्यांना 56 लाख 66 हजार 376 क्विंटल अन्नधान्याचे वाटप. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब, तसेच एपीएल शेतकरी लाभार्थी अशा रेशनकार्डमधील 7 कोटी 49 लाख नागरिकांपैकी 6 कोटी 52 लाख 32 हजार 448 लाभार्थ्यांना 20 लाख 72 हजार 104 क्विंटल गहू, 15 लाख 96 हजार 798 क्विंटल तांदूळ वाटप. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो गहू व तांदूळ) मोफत – 19 लाख 97 हजार 474 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप. स्थलांतरित परंतु लॉकडाऊनमुळे अडकलेल्या सुमारे 3 लाख 71 हजार 482 शिधापत्रिका धारकांमार्फत पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ते राहत असलेल्या ठिकाणीच अन्नधान्याची उचल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो मोफत तांदूळ ) – 32 लाख 435 क्विंटल तांदळाचे वाटप. कोविड-19 संकटावरील उपाययोजना- 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो)- 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (प्रति रेशनकार्ड 1 किलो तूर किंवा चणा डाळ मोफत) – 3 लाख 89 हजार 792 क्विंटल डाळीचे वाटप. आत्मनिर्भर भारत योजना (राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ) 1 लाख 35 हजार 308 क्विंटल तांदूळ वितरित. सायबर संदर्भात 574 गुन्हे दाखल, 290 व्यक्तींना अटक. तपशील – आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 211 गुन्हे दाखल, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 246 गुन्हे दाखल, ,टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी 28 गुन्हे दाखल, आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 18 गुन्हे दाखल, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 5 गुन्हे दाखल, अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी 66 गुन्हे दाखल. 118 आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश. वंदेभारत अभियानांतर्गत 406 विमानांनी आतापर्यंत मुंबईत 55 हजार 602 प्रवासी दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवासी- 18 हजार 670. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी -19 हजार 59 प्रवासी, राज्यातील प्रवासी- 17 हजार 873.या देशातून आले प्रवासी -ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयॉर्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो. लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे 22 मार्च ते 31 जुलै पर्यंत कलम 188 नुसार 2,18,059 गुन्ह्याची नोंद, 32,433 व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी 18 कोटी 1 लाख 39 हजार 904 रु. दंडाची आकारणी. अत्यावश्यक सेवेसाठी 6 लाख 79 हजार 547 पासेसचे वाटप. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 324 घटना, त्यात 883 व्यक्तींना ताब्यात. हेल्पलाइन 100 या क्रमांकावर 1,09,016 दूरध्वनी. ज्यांच्या हातावर क्वारंटाइन शिक्का आहे अशा 824 व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1,346 वाहनांवर गुन्हे दाखल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील 51 पोलीस व 4 अधिकारी अशा एकूण 55, ठाणे शहर 12 व ठाणे ग्रामीण 2 व 1 अधिकारी, रायगड 2, पुणे शहर 3, नाशिक शहर 1, सोलापूर शहर 3, अमरावती शहर 1 डब्ल्यूपीसी, मुंबई रेल्वे 4, नाशिक ग्रामीण 3, जळगाव ग्रामीण 1, जालना एसआरपीएफ 1 अधिकारी, नवी मुंबई एसआरपीएफ 1, पालघर ग्रामीण 2 व 1 अधिकारी, ए.टी.एस. 1, उस्मानाबाद 1, औरंगाबाद शहर 1, जालना ग्रामीण 1, नवी मुंबई 1, सातारा 1, अहमदनगर 1,औरंगाबाद रेल्वे 1, एसआरपीएफ अमरावती 1, अशा 102 पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यू. कोरोना संदर्भातील तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात पोलिसांसाठी सर्वत्र नियंत्रण कक्षाची स्थापना. सध्या कोरोना बाधित 218 पोलीस अधिकारी व 1716 पोलिसांवर उपचार सुरू. मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीला तीन दिवसात अहवाल देण्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांचे निर्देश. आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या, आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या. आज पुन्हा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक. बऱ्या झालेल्या १० हजार ७२५ रुग्णांची घरी रवानगी, ९६०१ नव्या रुग्णांची नोंद. आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे, बरे होण्याचे प्रमाण ६१.८१ टक्के. सध्या १ लाख ४९ हजार २१४ रुग्णांवर उपचार सुरू. आज नोद झालेले मृत्यू- ३२२ ००० इतर घडामोडी २७ जुलै २०२० महाराष्ट्रातील सर्व पुरातन वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून केंद्र शासनाने आर्थिक सहाय्य देण्याची सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री. एन. के. सिंग यांच्याकडे मागणी. विजयदुर्ग किल्ला हा केंद्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या अखत्यारितील भारतीय पुरातत्व विभागाकडे असल्याने या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाला परवानगी देण्याची सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची केंद्राकडे मागणी. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व इंटरनॅशनल जस्टीस मिशन (आय.जे.एम.) यांच्या संयुक्त विद्यमाने बालगृहातील मुलांच्या अनुषंगाने प्रश्नोत्तर स्वरूपाच्या दोन दिवसीय वेबिनारचे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन. बालहक्कांप्रती संवेदनशील आणि सक्रिय दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असून बालगृहातील बालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे ॲड. ठाकूर यांचे प्रतिपादन. मानव व बिबट्या सहसंबंध अधिक समजून घेण्यासाठी बिबट्याच्या टेलिमेट्री (दूरमिती) अभ्यासाला भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयालयाची मान्यता, महाराष्ट्राचा वन विभाग, महाराष्ट्र शासन व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया मार्फत संयुक्तपणे हा अभ्यास करणार असल्याची वनमंत्री संजय राठोड यांची माहिती प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली नसून या प्रकरणाची व्याप्ती पाहता ही सुनावणी ऑनलाइन न करता प्रत्यक्ष करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय गांभिर्याने विचार करीत असल्याचे दिसून आल्याचे मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन. “घरात राहा” या जनजागृती गाण्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या हस्ते अनावरण. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन अभिष्टचिंतन. २९ जुलै २०२० मंत्रीमंडळ निर्णय धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळीत समतोल आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम ५ पोट – कलम (2अ) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता, यापूर्वी सेवा प्रवेश नियम करत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय. महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार 7 सप्टेंबरपासून बोलविण्यात येण्याची शिफारस राज्यपालांना करण्यास मान्यता. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मंत्रीमंडळ बैठकीत अभिनंदन. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लवकरच बैठक घेऊन यावर मार्ग काढणार असल्याची परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडून दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयास 12 कोटी 79 लाख रुपये निधी मंजूर केल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांची माहिती. पाणी पुरवठा विभागातील तालुकास्तरावरील समुह व गट समुह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899 समूह समन्वयकांना लाभ. वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकाराच्या अनुषंगाने 31 जुलैला न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांची माहिती. सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा संदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागत असल्याने. संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे न्यायाधिकरण स्थापन करण्याची विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांची सूचना. पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या ठेवीसाठी आरबीट्रेटरने तातडीने कार्यवाही करण्याचे, विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांचे निर्देश. खेडी भोकर पुलाच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा- भोकर -जळगाव रस्ता राज्य मार्ग 40 या रस्त्यावरील खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता मिळाली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. युरीया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रीक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आल्याची कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती. 31 जुलै २०२० मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब उपस्थित. ठळक निर्देश- प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करणार, मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना, रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड, या फंडच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील सदनिकांच्या बांधकामासाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध,झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कायद्यामध्ये लवकरच बदल. अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व राज्‍याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याद्वारे दु:ख व्यक्त. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याद्वारे शोक व्यक्त. बकरी ईद निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या जनतेला शुभेच्छा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करण्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांचे आवाहन. पुणे येथील राज्य बाल संरक्षण संस्थेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय प्रतीपालकत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते समारोप, विभागाच्या अधिनस्त बालगृहातील अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित कुंटुंब, घर मिळवून देणाऱ्या प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजनेची प्रायोगिक स्वरूपात सुरुवात. संपर्क संकेतस्थळ- https://wcdcommpune.org मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील मंडळे/संस्था/समिती यांचे कार्य सुरळीत सुरु असून, या मंडळांची पुनर्रचना आणि नियुक्त्या करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची मराठी भाषा विभागाची माहिती. 1 ऑगस्ट 2020 मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात, अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक लवकरच मुंबईत उभारण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी ऑनलाइन आयोजित कार्यक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित. लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे अभिवादन. लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार,उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे अभिवादन. ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरिकांना शुभेच्छा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण या 7 दिवसांच्या ऑनलाईन कार्यशाळेचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फत दृकश्राव्य माध्यमातून आज राजभवन, मुंबई येथून उद्घाटन. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करण्याचे राज्यपालांचे आवाहन. पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचे महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 11 हजार 570 कर्मचाऱ्यांना दिलासा, संचालक मंडळाच्या बैठकीत प्रलंबित महागाई भत्त्यास मान्यता देण्यात आल्याची प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डिजिटल 8 अ सुविधेचा ऑनलाइन शुभारंभ.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Uddhav thackeray

  पुढील बातम्या