मुंबईत राष्ट्रपती राजवट लागू करा, मारहाण झालेल्या माजी अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

मुंबईत राष्ट्रपती राजवट लागू करा, मारहाण झालेल्या माजी अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्या एका 66 वर्षीय व्यक्तीला शिवसैनिकांची घरात घुसून चोप दिला. या प्रकरणाचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहे. या निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या मुलीने मुंबईत माणुसकी मेली आहे, राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना पीडित कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांच्या मुलीने रात्री नेमके काय घडले याची माहिती दिली.

'रात्री 10 वाजेपासून वडिलांना फोन येण्यास सुरुवात झाली होती. फोन वरुन धमक्या दिल्या जात होत्या. तुम्ही जो फोटो शेअर केला आहे. त्यावर ते बोलत होते. माझ्या वडिलांनी तो मॅसेज फॉरवर्ड केलेला आहे. असं सांगितलं पण त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही. त्यानंतर 12 वाजता लोकं घरी आली आणि त्यांनी वडिलांशी बोलायचं आहे म्हणून खाली बोलावलं, वडिल खाली गेले असता त्यांना लगेच मारहाण सुरू केली.' मनोज शर्मा यांची मुलगी शीला शर्माने हिने सांगितले.

तसंच, या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईत आता राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, इथं माणुसकी नावाची कोणतीही गोष्ट नाही.' अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेलं व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेचे 2 शाखा प्रमुख आणि 7-8 शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 2 शाखाप्रमुखांचा तर अन्य 2 कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Published by: sachin Salve
First published: September 12, 2020, 8:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या