गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्‍यास बंदी? पालिकेने दिली महत्त्वाची माहिती

गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्‍यास बंदी? पालिकेने दिली महत्त्वाची माहिती

गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आल्‍याचे वृत्त समाजमाध्‍यमांत प्रसारित होत आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : 'कोविड 19' च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना आणि आवाहन यापूर्वीच पालिकेनेही केले आहे. पण, गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आल्‍याचे वृत्त समाजमाध्‍यमांत प्रसारित होत आहे. त्यावर बृहन्‍मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे पत्रक जारी करत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

महापालिकेद्वारे गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्‍यावर बंदी घालण्‍यात आलेले नाही अशी माहिती देण्यात आली आहे. तर 'कोविड 19' च्या अनुषंगाने नागरिकांच्या सेवेसाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे बृहन्मुंबई क्षेत्रात 167 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेली असून सामाजिक दुरीकरण राखून कृत्रिम तलावात अधिक प्रमाणात श्री गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहनही पालिकेद्वारे करण्यात आलं आहे.

'जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल'; चंद्रकांत पाटलांचा नितीन राऊतांना इशारा

गणेश भक्‍तांच्‍या / नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अधिक संख्येने कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. ज्यानुसार आजपर्यंत 167 कृत्रिम तलाव तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरीही समुद्रात विसर्जन करण्यावर महापालिकेने बंदी घातलेली नाही, हे पुन्हा एकदा नमूद करण्यात येत आहे.

पुणेकरांच्या जीवाशी खेळ झाला तरी रेल्वेत आयसोलेशन वॉर्डमधील 450 बेड धूळखात...

समुद्र किनार्‍या लगतच्या एक ते दोन किलो मीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन हे समुद्रात करण्‍यास हरकत नाही. तर इतरांनी म्‍हणजेच जे भाविक समुद्रालगत रहात नाहीत अशांनी प्राधान्याने घरच्‍या-घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे; अशी सूचना महापालिका प्रशासनाची आहे.

पोलीस उपनिरीक्षकाचं गाडीवरून सुटलं नियंत्रण, पुढे घडला धक्कादायक प्रकार

महापालिका प्रशासन व राज्‍य शासन यांनी वेळोवेळी केलेल्‍या सूचना / आवाहनाचे पालन करावे. त्याचबरोबर 'कोविड 19' च्या पार्श्वभूमीवर शारीरिक दुरीकरण, मास्‍क, सॅनिटायझर वापरुन हा उत्सव पार पाडावा, असे आवाहन पालिकेने वेळोवेळी केलेले आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 12, 2020, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading