मुंबई-ठाण्यासाठी पुढील 3 तास महत्त्वाचे हवामान खात्यानं दिला इशारा

मुंबई-ठाण्यासाठी पुढील 3 तास महत्त्वाचे हवामान खात्यानं दिला इशारा

विजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोर धरला आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जून: मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढचे तीन तास मुंबई, ठाणे, उपनगर, पालघर, रायगडमध्ये वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत इंटरनेट कनेक्शची समस्या निर्माण झाली तर वीज पुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

चक्रीवादळानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात बुधवारी झाडं कोसळल्यानं आणि इमारतींचे पत्रे उडाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. गुरुवारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. 3 तास सलग पावसाचा जोर कायम असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

हे वाचा-फक्त 60 सेकंदांमध्ये 10 घरांवर कोसळलं वडाचं झाड, पाहा थरारक Live Video

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अत्यवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं होतं. विजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोर धरला आहे.

दक्षिण मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढचे तीन तास पावसाचा जोर कायम राहिलं असा अंदाज हवामान विभाकडून वर्तवण्यात आला आहे. वसई-विरारमध्ये गुरुवारी सकाळपासून दमदार हजेरी लावली. वसईत 22 मीमी माणिकपूर 24 मिमी मांडवी 24 मिमी ,विरार 26 निर्मळ 19 मिमी,पावसाची नोंद झाली असून बुधवारपासू पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

हे वाचा-पुढील दोन तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा

First published: June 4, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading