• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • येत्या 48 तासांत राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडसह या 10 जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्याची शक्यता

येत्या 48 तासांत राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडसह या 10 जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्याची शक्यता

पुढील 48 तास कसं असेल राज्यातील हवामान, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा वाचा सविस्तर

 • Share this:
  मुंबई, 7 जानेवारी : पुढील दोन दिवस कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 2 ते 3 दिवस पाऊस पडणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढचे 48 ते 72 तासांत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बदललेलं वातावऱण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळबागा शेतमालाचं नुकसान होईल अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. अवकाळी पावसामुळे फळ झाडांना आलेला मोहोर गळून पडण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे. हे वाचा-धक्कादायक! मुंबई रेल्वे कार्यालयात चीफ बुकिंग सुपरवायझरची आत्महत्या भारतीय हवामान विभागानं कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या आंदाजानुसार 7 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस यलो अलर्ट असल्याचा इशारा दिला आहे. उर्वरीत राज्यात काही भागांमध्ये रिमझित पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.
  Published by:Manoj Khandekar
  First published: