मुंबई 12 ऑक्टोबर: परतणारा पाऊस पुन्हा एकदा जोरदार बरसणार अशी शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्याने दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मान्सून आता परतीच्या मार्गावर आहे. मात्र जाणारा हा पाऊस पुन्हा एकदा राज्याला झोडपण्याची शक्यता आहे. या आठवडाभर राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार (Heavy to very heavy rains) पावसाचा इशारा वेधशाळेने (IMD Alert) या आधीही दिला होता.
17 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कापणीला आलेल्या पिकांवर त्याचा दाट प्रभाव होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र वातावरण बदलल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंबं फुटली आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली
दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा देण्यता आला आहे.@IMDWeather
📙https://t.co/Ae6uryZW5q pic.twitter.com/xLLIjDvGB9
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) October 12, 2020
तर शेतकऱ्यांनी चिंता करू नये. पिकांचं जे नुकसान झाले त्याचा पंचनामा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.