Home /News /mumbai /

मुंबई, ठाण्यासह कोकणात गारठा वाढणार, उत्तर भारतात थंडीची लाट

मुंबई, ठाण्यासह कोकणात गारठा वाढणार, उत्तर भारतात थंडीची लाट

मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून 12 ते 14 डिग्रीपर्यंत तपामान खाली येण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 19 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे मागच्या आठवड्यात ऐन थंडीतही मुंबई ठाण्यासह उपनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर तपामानात घट झाली होती. या आठवड्यात बऱ्यापैकी मुंबईसह उपनगरात गारवा जाणवत होता. येत्या सोमवारपासून मुंबई ठाण्यासह कोकण विभागातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.येत्या आठवड्यात मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून 12 ते 14 डिग्रीपर्यंत तपामान खाली येण्याची शक्यता आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारठा वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून गुरुवारी वर्तवण्यात आला होता. हे वाचा-कोरोनामुळे पतीचं झालं निधन, महिनाभरानंतर SMSवर आला निगेटिव्ह रिपोर्ट! उत्तर भारतातील नागरिकांना भरली हुडहुडी उत्तर भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान इथे तापमानात मोठी घट झाली आहे. मध्य प्रदेशात तापमान 5 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील बर्‍याच भागात किमान तापमान सामान्यपेक्षा 2-6 डिग्री सेल्सिअस राहील. पहिल्या आठवड्यात देशातील उर्वरित भागातील तापमान सामान्य किंवा जवळपास किंचित जास्त राहील असा अंदाज आहे. IMDने दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा आणि चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये गारठा वाढेल आणि आठवड्याअखेरीस तापमानात पुन्हा वाढ होईल. हवामान खात्याने सांगितले की, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशात पुढील दोन दिवस थंडी असेल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Mumbai, Thane

    पुढील बातम्या