मुंबईकरांनो सावधान! येत्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह धुवांधार पावसाची शक्यता

मुंबईकरांनो सावधान! येत्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह धुवांधार पावसाची शक्यता

IMD नुसार रविवारीदेखील मुंबईतील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : मुंबई आणि परिसरात शुक्रवारपासून पावसानं सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी (28 जुलै)पहाटेपासूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. IMDनुसार रविवारीदेखील मुंबईतील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं IMDकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आलं आहे. रविवारी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या प्रवक्त्यांनी दिली.

(पाहा : VIDEO : मुंबई-ठाण्यात पुढच्या 48 तासात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी)

11 उड्डाणे रद्द  

मुसळधार पावसामुळे शनिवारी (27 जुलै) हवाई वाहतुकीवर परिणाम झाला होता. यामुळे तब्बल 11 उड्डाण रद्द करण्यात आली होती तर 9 विमानांच्या मार्गात बदल करण्यात आला.

(पाहा : कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO)

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांची 17 तासांनंतर सुटका

बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर पावसाचं पाणी साचल्यानं कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. एक्स्प्रेसमध्ये जवळपास 2 हजार प्रवासी होती. तब्बल 17 तासांनंतर या सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफ, भारतीय सेना, नौसेना, वायुसेना आणि रेल्वे प्रशासनानं अथक मेहनत घेत शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व प्रवाशांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.

(पाहा : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप सुटका, पाहा VIDEO)

रायगडमध्ये घरे बुडाली

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शेलू केबिके नगरात पावसाने हाहाकार उडवला आहे. इथली घर अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे 400 कुटुंबांनी आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये आसरा घेतला आहे. त्यांना अद्याप कुठलीही शासकीय मदत मिळालेली नाही. येथील अनेक रहिवासी मूळचे  कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील आहेत.

VIDEO: पावसाचा हाहाकार! कर्जतमध्ये घरं पाण्याखाली, नागरिकांचे हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 07:25 AM IST

ताज्या बातम्या