मुंबई, 21 जुलै: आज सकाळपासूनच मुंबईत (Mumbai) रिमझिम पाऊस (Light Rain) सुरू आहे. आज दुपारी 4 नंतर मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसाठी अति महत्त्वाचे असणार आहेत. उद्या सकाळी साडे आठ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज मुंबईसह राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे.
हवामान खात्यानं आज मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार आहे. तसेच वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-काय आहे कोरोनाची Warm Vaccine? का होतेय त्याची चर्चा, वाचा सविस्तर
याशिवाय आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वाऱ्याची गती 30-40 किमी प्रतितास इतकी असण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांसाठी कोकणाला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे दरम्यान कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता देखील आहे.
Severe weather warnings over the region during next 5 days. Kindly visit https://t.co/89p4H3QwEY… for detailed district wise forecast and warnings. pic.twitter.com/1QjQQAdpOH
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 21, 2021
हेही वाचा-महाराष्ट्र, केरळमध्येच का वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या? IMA ने सांगितलं कारण
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातही अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच मराठवाड्यातही चांगल्या स्वरुपाचा पाऊसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्याच्या परिसरातही रेड अलर्ट देण्यात आला. उद्या सकाळी साडे आठ वाजल्यानंतर मुंबईत ऑरेंज अलर्ट असणार आहे", अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai rain, Pune, Weather forecast