Home /News /mumbai /

सावधान...विदर्भ, मराठवाड्यात 'या' दोन दिवशी होणार पाऊस

सावधान...विदर्भ, मराठवाड्यात 'या' दोन दिवशी होणार पाऊस

पावसामुळे थंडीचा जोर आणखी वाढू शकतो. गहू, हरभरा आणि तर काही पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

    सागर कुलकर्णी, मुंबई 05 जानेवारी : राज्यात थंडीचा जोर वाढलेला आहे. मुंबईतही चांंगलाच गारवा जाणवतोय. असं असताना पाऊस मात्र अजुनही पाठ सोडायला तयार नाही. काही दिवसांपूर्वीच विदर्भात गारपीट झाली होती. आता पुन्हा एकदा पाऊस होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेने व्यक्त  केलाय. 7 ते 9 जानेवारी दरम्यान विदर्भ आणि मराठवाडातील काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढू शकतो. गहू, हरभरा आणि तर काही पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मोसमी पाऊस राज्यातून परतल्यानंतर अवकाळी पावसाचं आगमन झालं. सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झालीय. त्यामुळे थंडीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झालीय. दरवर्षी या काळात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पारा चांगलाच खाली येतो. सध्या काश्मीरमध्ये हिमवर्षाव होत असल्याने त्याचाही परिणाम राज्यातल्या वातावरणावर होणार आहे. काश्मीरप्रमाणेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेतल्या थंडीचं प्रमाणही वाढणार आहे. राज्मायातून मान्सूनचं  परत जाणं तब्बल एक महिन्याने लांबलं होतं. सुरुवातीला थोडा रखडणारा मान्सूनने नंतर सर्व राज्यभर प्रचंड धुमाकूळ घातला होता. तर काही भागाकडे पाठ फिरवली. मात्र कोल्हापूर, पुणे आणि मुंबईत गेल्या काही दशकांमधला यावर्षी पाऊस हा सर्वात जास्त पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले... मान्सून परतल्यानंतर ऑक्टोबर उष्णता भडकण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली होती. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. नंतर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या बऱ्याच भागातून मान्सूनची एक्झिट झाली होती.      
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या