'हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे' राम मंदिराबद्दल शिवसेनेची सूचक जाहिरात

'हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे' राम मंदिराबद्दल शिवसेनेची सूचक जाहिरात

अयोध्येत निर्माण होणाऱ्या रामलल्ला मंदिरासाठी शिवसेनेनं केलेल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शिवसेनेनंही राम मंदिराच्या आठवणींना उजाळा देत 'हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे!' अशा शिर्षकाची सूचक जाहिरात केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये ही पहिल्या पानावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !" अशा शिर्षकाखाली ही मोठी जाहिरात करण्यात आली आहे.  अयोध्येत निर्माण होणाऱ्या रामलल्ला मंदिरासाठी शिवसेनेनं केलेल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही जाहिरात शिवसेनेचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. तर या फोटोमध्ये बाबरी मस्जिद विद्धवंसाचा फोटो वापरण्यात आला आहे.

तर दुसरीकडे सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला टोला लगावला आहे.

‘‘बाबरी पडली, ती पाडणाऱ्य़ा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे!’’ या एकाच गर्जनेने बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट म्हणून कोट्यवधी हिंदूंच्या दिलाचे राजे बनले. आज ते स्थान अढळ आहे. त्या सगळ्यांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे. पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील. बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल!' असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे.

न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुंत्यातून बाहेर काढले व स्पष्ट निकाल राममंदिराच्या बाजूने दिला. ते न्या. रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते, पण रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही. राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्य़ा कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे. अर्थात जिथे श्रीराम हे कौटुंबिक राजकारण व अंतर्विरोधाचे बळी ठरले, तिथे इतर पामरांचे काय? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.

Published by: sachin Salve
First published: August 5, 2020, 9:03 AM IST
Tags: Ram Mandir

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading