मुंबई, 22 मार्च : मशिदीवरील भोंग्याच्या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुंबईतल्या माहीम समुद्र किनाऱ्याच्या आतमध्ये अनधिकृत मजार बांधली गेल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. जाहीरसभेमध्येच राज यांनी मजारचा व्हिडीओ दाखवला असून महिन्यात हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली आहे. जर हे काम तोडलं नाहीतर तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू, जे होईल ते होईल, असा कडक इशाराच राज ठाकरेंनी दिला.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची तोफ चौफेर धडाडली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी माहिमच्या समुद्रात मजार बांधली गेली असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
'हे इथं असलेल्या मगदूनबाबाच्या समोर, अनधिकृत मजार बांधली जात आहे. दोन वर्षांमध्ये हे उभं केलं आहे, लोकांचं लक्ष नाही. महापालिकेचे लोक फिरतात, पाहिलं नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करणार, आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त आजच सांगतो, महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं नाही, त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.
(Raj Thackeray Rally: सभेआधी 'राज'पुत्राने जिंकलं मन, शिवाजी पार्कवर अमित ठाकरेंनी काय केलं?)
प्रशासनच दुर्लक्ष असल्याने काय घडू शकतं, हे चित्र मी दाखवत आहे. जे या देशातील घटना माणणारे मुसलमान आहे त्यांना आहे मान्य आहे का? हे व्हिडिओ दाखविल्यानंर सरकारने कारवाई करत नसेल तर महिन्याभरात काय होईल मला माहीत नाही. माहीम जवळील समुद्रातील व्हिडीओ दाखविले आहे. ज्यावर मजार बनविले आहे, असा सवालही राज ठाकरेंनी केला.
(..मला असे मुसलमान हवे, राज ठाकरेंचं लाव रे व्हिडीओ, मनसेच्या इतिहास पहिल्यांदाच घडलं)
कुणी यावं आणि टपल्ली मारून जावं, हे राज्यात चालणार नाही. माझ्या हातात सत्ता दिली तर सुता सारखं सरळ करून टाकेन. तुमच्या डोळ्या देखत घडले. आम्ही राजकारणात गुंतलो आहे. जसा मुस्लिम समाज आहे, त्याला तरी मान्य आहे का. कुणाची समाधी आहे, माशाची समाधी आहे का? हे लोक म्हणाले, पेंग्विन...पण राजकर्ते दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतलेले असतात, त्यासाठी हा स्क्रिन लावला होता. येणारी रामनवमी जोरात साजरी करा, येत्या 6 जूनला शिवरायांच्या राज्यभिषेकला 350 वर्ष होणार आहे, मी स्वत: रायगडाला जाणार आहे. तुम्ही सुद्धा या. बेसावध राहू नका, पाळत ठेवा, आज बेसावध राहिला तर जमीन निघून जाईल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.