मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'जसं 12 तासात अतिक्रमण काढलं तसंच आता...', जितेंद्र आव्हाडांचा अल्टिमेटम!

'जसं 12 तासात अतिक्रमण काढलं तसंच आता...', जितेंद्र आव्हाडांचा अल्टिमेटम!

जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला अल्टिमेटम

जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला अल्टिमेटम

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर माहीम आणि सांगलीमधल्या मशिदींचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं, यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च : गुढी पाडव्याच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहिममधली अनधिकृत मजार आणि सांगलीतल्या अनधिकृत मशिदीचा मुद्दा उपस्थित केला होता. कारवाई झाली नाही तर माहिममधल्या त्या मजारीशेजारी गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाने दोन्ही ठिकाणचं अनधिकृत बांधकाम पाडलं. या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे.

मुंबईतील बेस्ट बसेसवरील कर्नाटक सरकारच्या जाहिराती काढल्या नाहीत तर संतप्त जनता बसेस फोडेल असा इशारा राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.. सभागृहाबाहेर विविध मुद्द्यांवर बोलतांना त्यांनी हा इशारा दिला. बेस्ट बसवर 'चला कर्नाटक नव्याने पाहुया' अशा प्रकारच्या जाहिराती लावण्यात आलेल्याच्या मुद्द्यावरून आव्हाडांनी टीका केली. एकीकडे सीमाभागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर अत्याचाराची मालिका सुरू असून त्याच कर्नाटकाला छाताडावर बसवण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही आव्हाडांनी केलीये. यावेळी बोलतांना त्यांनी मनसेवरही टीका केली. मुंबईला डान्सबार म्हणणं चुकीचं असल्याचंही आव्हाड म्हणाले आहेत.

'ज्या महाराष्ट्राला मुंबई मिळाली आहे, त्या मुंबईमध्ये मराठी माणसाच्या तोंडावर छाताडावर बसून मुंबई महापालिकेने स्वत:च्या बसेसवर जाहिरात केली आहे, चला नव्याने कर्नाटक बघूया. हा मराठी माणसांचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकारने याची नोंद घ्यावी. जसं तुम्ही 12 तासात अतिक्रमण काढलं, तसं 12 तासात बेस्ट बसवरच्या जाहिराती काढा. नाही तर ज्या बसवर या जाहिराती आहेत, त्या बस मराठी माणूस फोडेल', असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

माहिम आणि सांगलीमधल्या या कारवाईनंतर आता मनसेच्या रडारवर मुंब्रामधल्या अनधिकृत मशिदी आणि दर्गे आले आहेत. या अनधिकृत मशिदी आणि दर्गे हटवण्याची मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. यासाठी अविनाश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या अनधिृत मशिदी आणि दर्गे यांच्यावर कारवाई केली नाही, तर बाजूलाच हनुमान मंदीर उभारू, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Jitendra awhad, Raj Thackeray