नवी मुंबई महापालिकेचा नवा घोटाळा, अनधिकृत बांधकामांसाठीच्या नोटीसा बनल्या वसुलीचं साधन!

नवी मुंबई महापालिकेचा नवा घोटाळा, अनधिकृत बांधकामांसाठीच्या नोटीसा बनल्या वसुलीचं साधन!

26 वर्षांत तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेचा कालावधी सोडला तर ना गुन्हे दाखल केले, ना कारवाई केली गेली. महापालिकेची नोटीस म्हणजे विभाग अधिकाऱ्यांचं एटीएम मशीनच झालंय.

  • Share this:

11 एप्रिल : नवी मुंबई महापालिकेचा एक घोटाळा समोर आला आहे. शहरातल्या अनधिकृत बांधकामांसाठी बजावण्यात आलेल्या नोटीसा या फक्त वसुलीसाठी बजावण्यात आल्याचं समोर आलं आहे. नोटीस बजावलेली शेकडो बांधकामं पूर्ण होऊन आता त्यात लोक रहायला गेली आहेत. यावरून हातमिळवणी किती प्रमाणात झाली हे लक्षात येते.

नक्की कसा झालाय नोटिसांचा घोटाळा?

नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांनी 30 हजाराच्यावर एमआरटीपीच्या 53(अ) आणि 54 च्या नोटीसा बजावल्यात. या नोटीसा बजावल्यानंतर 32 दिवसाच्या आत संबंधीत व्यक्तीनं आपलं बांधकाम तोडायच असतं. अन्यथा महापालिकेने संबंधितांवर गुन्हा दाखल करून बांधकाम तोडायला पाहिजे.

मात्र 26 वर्षांत तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेचा कालावधी सोडला तर ना गुन्हे दाखल केले, ना कारवाई केली गेली. महापालिकेची नोटीस म्हणजे विभाग अधिकाऱ्यांचं एटीएम मशीनच झालंय.

तब्बल 26 वर्षांनंतर आयुक्त रामास्वामी यांनी या नोटिसांची नोंद ठेवण्यास सुरुवात केली. आता एखादी जरी नोटीस बजावली गेली तर त्याची नोंद मुख्यालयात होते. एवढंच नव्हे 26 वर्षांपासून बजावण्यात आलेल्या नोटिसांचा अहवाल ही तयार केला जातोय.

दरम्यान, नोटीसा बजावून कारवाई न करता संबंधीत व्यक्ती कडून पैसे उकळणाऱ्या विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नवी मुंबईकरांकडून होतेय.

First published: April 11, 2018, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading