राज ठाकरेंची आज EDसमोर होणार चौकशी, कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन

राज ठाकरेंची आज EDसमोर होणार चौकशी, कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिल प्रकरणी आज ईडीकडून चौकशी होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिल प्रकरणी आज ईडीकडून चौकशी होणार आहे.  या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मनसैनिक आक्रमक झाले आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रक काढून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केले. 'ईडीसारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरे देईन. पण, तुम्ही सर्वांनी शांतता राखा, ईडीच्या कार्यालयाजवळ कोणीही येऊ नका. तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या', असे आवाहन राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

(पाहा : उद्धव ठाकरेंनी दिली राजना क्लीन चिट? पाहा हा SPECIAL REPORT)

मनसैनिकांची आत्महत्या, काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता प्रवीण चौगुले यानं मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा दावा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रवीणच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत म्हटलं की, ''आपला सहकारी प्रवीण चौगुले याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा. प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे याची मला जाणीव आहे'.

(वाचा : नाराज राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, लवकरच घेणार मोठा निर्णय)

कपिल पाटील यांचं राज ठाकरेंसाठी ट्विट

(पाहा : राज ठाकरेंना ईडी नोटिसीबद्दल आंबेडकरांनी बाळा नांदगावकरांना काय सांगितलं होतं?)

आक्रमक मनसैनिकांनी पोलिसांकडून नोटीस

राज ठाकरेंविरोधात होणाऱ्या कारवाईमुळे आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून अशा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अशा प्रकाच्या नोटीस बजावण्यात आल्या असून काहींना हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम 149 नुसार या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मनसेच्या अनेक नेत्यांनी आंदोलनाचे इशारे दिले होते. तर काहींनी खळ खट्याक आंदोलनाचाही इशारा दिला होता. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या नोटीस दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सामाजिक शांतता भंग झाली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल, असा इशाराही या कार्यकर्त्यांना देण्यात आलाय.

VIDEO : कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरे झाले भावुक, केलं हे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 07:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading