मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाबाबत IIT मुंबईच्या अहवालामुळे मुंबईसह राज्याला मोठा दिलासा

कोरोनाबाबत IIT मुंबईच्या अहवालामुळे मुंबईसह राज्याला मोठा दिलासा

कोरोनाच्या स्थितीबाबत एक अहवाल सादर केला असून कोरोना संसर्ग कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकतो, याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या स्थितीबाबत एक अहवाल सादर केला असून कोरोना संसर्ग कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकतो, याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या स्थितीबाबत एक अहवाल सादर केला असून कोरोना संसर्ग कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकतो, याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 20 जुलै : मुंबईतील विविध भागांसह राज्यभरात वाढ असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे शासन-प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मात्र अशातच आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी कोरोनाच्या स्थितीबाबत एक अहवाल सादर केला असून कोरोना संसर्ग कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकतो, याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. राजधानी मुंबईतील करोना संसर्ग पुढील दोन आठवड्यांमध्ये नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे. तर राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण रोखण्यात यश येईल, असंही सांगण्यात आलं आहे. ‘लेविट्स मॅट्रिक्स’ या गणितीय प्रारूपाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या, मृत्यू दर त्यासाठीचा कालावधी याचा आधार मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी यासाठी घेतला. याबाबत 'लोकसत्ता'ने वृत्त दिलं आहे. दरम्यान, आयआयटीच्या अहवालानुसार मुंबईत करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 क्क्य़ांपर्यंत वाढला आहे. दोन आठवडय़ांत मुंबईत करोना नियंत्रणात येईल असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत कोरोनाची काय आहे स्थिती? रविवारी मुंबईत 1038 नवे रुग्ण एकूण रुग्ण - 1 लाख 1 हजार 388 रविवारी मुंबईत 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू मुंबईत एकूण मृत्यू - 5714 मुंबईतील अ‍ॅक्टिव केसेस - 23 हजार 697 राज्यात काय आहे स्थिती? राज्यात रविवारी 3906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 69 हजार 569 झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या 9518 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 15 लाख 64 हजार 129 नमुन्यांपैकी 3 लाख 10 हजार 455 नमुने पॉझिटिव्ह (19.55 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 54 हजार 370 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 45 हजार 846 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या