'डस्टबिन'ने कोरोनामुक्त होणार फळं-भाज्या; IIT मुंबईची भन्नाट आयडिया

'डस्टबिन'ने कोरोनामुक्त होणार फळं-भाज्या; IIT मुंबईची भन्नाट आयडिया

आपल्या दैनंदिन वापरातील कित्येक वस्तू अशा आहेत ज्या Coronavirus मुक्त करण्यासाठी Sanitizer Gel वापरणं शक्य नाही.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : कोरोनाव्हायरस (CoronaVirus) होऊ नये म्हणून आपण हात स्वच्छ धुतो, बाहेरून आल्यानंतर शक्यतो अंघोळ करतो जेणेकरून शरीरावर कुठेच व्हायरस राहणार नाही. बाहेर वापरलेले कपडेही धुवायला टाकतो. मात्र याचा अर्थ तुम्हाला आता व्हायरसचा धोका नाही असा नाही.

कोरोनाव्हायरस हा विविध पृष्ठभागावर एका विशिष्ट वेळेपर्यंत जिवंत राहतो, हे अनेक संशोधनात दिसून आलं आहे. म्हणजे हा व्हायरस आपल्याजवळील मोबाईल, पर्स, चावी, पैसे अशा छोट्या छोट्या वस्तू आणि आपण घरात आणत असलेली फळं-भाज्या, दुधाची पिशवी अशा इतर कोणत्याही वस्तूंवर असू शकतो.

मात्र अशा वस्तू Sanitizer gel किंवा इतर केमिकलने sanitize करणं शक्य नाही. मग या वस्तू नेमक्या sanitize करायच्या कशा? अशा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. याचं उत्तर शोधलं आहे, आयआयआयटी मुंबईने (IIT BOMBAY)

IIT Bombay च्या विद्यार्थ्यांनी असं उपकरण तयार केलं आहे, जे अशा सर्व वस्तू sanitize करतं. यूव्ही लाईटच्या सी फ्रिक्वेन्सीचा वापर करून हे सॅनिटायझर बनवण्यात आलं आहे.

कसं आहे हे उपकरण?

-हे उपकरण आपण घरात वापरत असलेल्या डस्टबिनसारखं आहे.

-डस्टबिनचं पेंडल पायाने दाबलं की झाकण उघडेल.

-त्यानंतर त्यात तुम्हाला जी वस्तू sanitize करायची आहे ती ठेवा आणि झाकण बंद करा.

-सुरुवातीला लाल लाईट दिसेल आणि काही वेळाने हिरवी लाईट पेटेल.

-हिरवी लाईट पेटली म्हणजे वस्तूचं sanitization पूर्ण झालं.

-वस्तू बाहेर काढण्यापूर्वी तुम्ही हात स्वच्छ करून घ्या.

-नंतर सुरुवातीप्रमाणेच पेंडल पायाने दाबून झाकण उघडून त्यातील वस्तू काढून घ्या.

यासाठी फक्त 500 रुपये खर्च आला आहे. सध्या याचा प्रोटोटाईप तयार करण्यात आला आहे. अर्थसहाय्य मिळाल्यानंतर हे उपकरण मुबलक प्रमाणात बनवलं जाईल, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं.

कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक

अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...

First published: April 13, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या