Home /News /mumbai /

हिंमत असेल तर पोलिसांत जा, ही माझी वॉर्निंग, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार

हिंमत असेल तर पोलिसांत जा, ही माझी वॉर्निंग, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार

'नाईक, वायकर आणि ठाकरे परिवारात काय आर्थिक लागेबांधे काय आहेत? उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत, त्याची उत्तरं द्यावी'

    मुंबई, 13 नोव्हेंबर : 'धमकीची भाषा वापरणे हे शिवसेनेचा जमते. जर हिंमत असेल तर माझ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जा, ही माझी वॉर्निंग आहे, अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Leader kirit somaiya)यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक व्यवहाराबद्दल उत्तर द्यावे, असंही सोमय्या म्हणाले. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. आज पुन्हा एकदा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'या सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.  यावर संजय राऊत आणि शिवसेना नेते का बोलत नाहीत. धमकी देण्याची भाषा संजय राऊतांची आहे. आम्ही त्या भाषेत बोलणार नाहीत.  राऊतांमध्ये हिंमत असेल तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी,  ही माझी वॉर्निंग आहे. हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावी, असा पलटवार सोमय्यांनी केला आहे. Tiger is Back: अँजिओप्लास्टीनंतर कपिल देव यांनी शेअर केला भावूक करणारा VIDEO '30 सातबाऱ्यांवर अन्वय नाईक परिवार आणि रश्मी ठाकरे यांचे एकत्रित नाव आहे. मुळ मुद्दे भरकवटण्याचा प्रयत्न केले जात आहे.  नाईक, वायकर आणि ठाकरे परिवारात काय आर्थिक लागेबांधे काय आहेत?  उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत, त्याची उत्तरं द्यावीत, असंही सोमय्या म्हणाले. सोमय्यांचा ठाकरे मुंबईच्या महापौरांवर गंभीर आरोप दरम्यान, मुंबईत गरीब झोपडपट्टी वासीयांसाठी बांधण्यात आलेले अर्धा डझणाहून अधिक गाळे अपारदर्शकरित्या महापौर यांनी स्वत:च्या परिवाराच्या ताब्यात ठेवले आहेत, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत सर्व पुरावे याचिकेत दिले आहेत, असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं. सरकारकडून पेन्शनर्ससाठी दिवाळी गिफ्ट; केवळ ७० रुपयांत घ्या या सेवेचा लाभ “सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए, मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. इतकंच नाही तर महापौरांनी बनावट सही करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काय म्हणाले होते राऊत? 'एका महिलेचं कुंकू पुसलं गेलं. अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून आक्रोश करत आहे. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते काही बोलायला तयार नाही. आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहोत तेव्हा या प्रकरणाचा तपास भरकटून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी शेटजींच्या पक्षाचे नेते तेव्हा हे अत्यंत फालतू असे मुद्दे घेऊन समोर येत आहे' अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. तसंच, 'म्हणे, 21 व्यवहार केले आहे. ते दाखवावे, हा खोटारडेपणाचा कळस आहे. एक लक्षात घ्या, त्यांनाही वॉर्निंग आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे' असा इशाराही राऊत यांनी दिला. 'भ्रष्टाचाराचे ते सारखे आरोप करत असता. पण ते रोज सकाळी आरशात स्वत: चा चेहरा पाहतात, त्यात त्यांना भ्रष्टाचार झाल्याचा वाटत असेल.  ते उलट आरशातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत असतील, ते वैफल्यग्रस्त झाले आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 'एका गुन्हेगाराला तुम्ही पाठीशी घालत आहात. तो तुमचा कोण लागत आहे. ती महिला तुमची कुणी लागत नाही का, एका महिलेचा पती मेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का, असा संतप्त सवालही राऊत यांनी विचारला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या