मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

72 तासांत माफी मागा नाहीतर..., अनिल परबांनी पाठवली किरीट सोमय्यांना थेट नोटीस

72 तासांत माफी मागा नाहीतर..., अनिल परबांनी पाठवली किरीट सोमय्यांना थेट नोटीस

अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना माफी मागण्यासाठी 72 तासांची मुदत दिली होती.

अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना माफी मागण्यासाठी 72 तासांची मुदत दिली होती.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केले आहे.

मुंबई, 14 सप्टेंबर : शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीच्या (ncb) मंत्री आणि आमदारांवर आरोपास्त्र उपसणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब  (Anil Parab) यांनी '72 तासांत माफी मागा मागवी अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असा इशाराच किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपाला आता परब यांनी कायदेशीररित्या उत्तर देण्याची तयारी केली आहे. सोमय्यांनी जे काही आरोप केले आहे. त्या आरोपांचं पुरव्यासह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा 72 तासात माफी मागावी नाहीतर किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, अशी नोटीसच अनिल परब यांच्या वकिलांनी सोमय्या यांना पाठवली आहे.

BREAKING : 6 दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडला मुंबईमधून अटक, दाऊदच्या होता संपर्कात

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केले आहे. एसटी  महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत 10 कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प 50 कोटींचा  घोटाळा अशा अनेक चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

थेट सफारी गाडीवरच चढला चित्ता आणि...; नॅशनल पार्कमधील धडकी भरवणारा VIDEO VIRAL

तसंच, नाशिक पोलीस, लोकयुक्तांकडं अनिल परब यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू आहे. तसंच सीबीआय, एसीबी, ईडी, एनआयए, अँटी करप्शन देखिल या घोटाळ्यांची चौकशी करत आहेत. तसंच राज्यपालांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब हे दोन महिन्यांचे पाहुणे असल्याचा दावाच सोमय्या यांनी केला होता.

First published:

Tags: Anil parab, Shivsena