मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'रात्री 11 वाजता तिच्या घरी पोहोचलो तर...' नेटकऱ्याच्या प्रश्नावर Mumbai पोलिसांनी घेतली फिरकी

'रात्री 11 वाजता तिच्या घरी पोहोचलो तर...' नेटकऱ्याच्या प्रश्नावर Mumbai पोलिसांनी घेतली फिरकी

मुंबई पोलिसांनी खुमासदार पद्धतीने उत्तर दिलं आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे

मुंबई पोलिसांनी खुमासदार पद्धतीने उत्तर दिलं आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे

मुंबई पोलिसांनी खुमासदार पद्धतीने उत्तर दिलं आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 31 डिसेंबर : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) रात्री 11 नंतर संचारबंदी लागू केली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडू नये व कोरोनावरील नियंत्रण कायम राहावे यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. दरम्यान मुंबई पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांशी संवाद साधत असतात. आपल्या खुमासदार शैलीत ते ट्विटला प्रत्युत्तरही देतात. (Mumbai Police Tweet Viral) अशातच सध्या संचारबंदीच्या नियमांचं पालन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वांना नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी ऑनलाइन एकत्र या असं आवाहन केलं आहे. मात्र यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. यातील एका नेटकऱ्याने मुंबई पोलिसांना वेगळाच प्रश्न विचारला आहे. दीपक जैन या नेटकऱ्याने विचारलं की, जर मी तिच्या घरी रात्री 11 वाजता पोहोचलो आणि रात्रभर तिथेच राहिलो तर...यावर मुंबई पोलिसांनी जबरदस्त उत्तर दिलं आहे. सध्या त्यांच्या उत्तराची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर मुंबई पोलिसांनी म्हटलं की, तू तिची परवानगी घेतली असेल, अशी आशा आहे. अन्यथा आमच्या डोक्यात चांगला पर्याय आहे. त्यांच्या या उत्तराला अनेक लाइक्स मिळत आहे.
First published:

Tags: Mumbai police, Tweet

पुढील बातम्या