मध्यावधी झाल्यातर आम्ही लढू आणि जिंकूही -अमित शहा

मध्यावधी झाल्यातर आम्ही लढू आणि जिंकूही -अमित शहा

मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता नाही पण जर निवडणुका झाल्या तर आम्ही लढू आणि जिंकूही असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी व्यक्त केला.

  • Share this:

17 जून : मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता नाही पण जर निवडणुका झाल्यातर आम्ही लढू आणि जिंकूही असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी व्यक्त केला. तसंच  भाजप सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असंही शहा म्हणाले.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा आज मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विकास कामाचा पाढा वाचला. आमचं सरकार संवेदनशील आहे. आम्ही देशातील लोकांनी विचार करण्याच्या पद्धतीत आम्ही बदल घडवला. जे 50 वर्षांत झालं नाही ते भाजप सरकारने तीन वर्षात केलं असा दावा शहा यांनी केला.

तसंच नोटाबंदी, सिलेंडर वाटप, जनधन योजनासह अनेक मोठ्या योजना सरकारने सुरू केल्यात.  2022 साली जेव्हा स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील. तेव्हा भारत एका नव्या उंचीवर गेलेला असेल असा विश्वासही शहांनी व्यक्त केला.

केंद्रानं महाराष्ट्राच्या विकासासाठी सुद्धा मोठी भूमिका बजावली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत 26 हजार कोटी रुपयांची मदत दिलीये. शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी देवेंद्र सरकार सक्षम आहे असंही शहा म्हणाले.

2014 नंतर झालेल्या सर्व निवडणुका मग त्या लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज संस्था असो सगळीकडे भाजपनं घवघवीत यशं मिळवलंय. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकारची कामगिरी चांगली आहे असं कौतुकही शहा यांनी केलं.

सेनेला टोला

शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत आणि स्वामिनाथन यांचं नाव पुढे केलंय. यावर अमित शहांनी पत्रकारांच्या प्रश्नावर गुगली टाकली. शिवसेनाच काय तुम्ही सुद्धा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव जरी सुचवलं तरी त्याचा आम्ही विचार करू असा टोला लगावला.

'भारतात पाकसोबत सामने नकोच'

भारत आणि पाकिस्तान आंतराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट सामने खेळू शकतो पण भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जाऊन भारत कधीच किक्रेट खेळू शकणार नाही असंही शहांनी म्हटलंय.

First published: June 17, 2017, 4:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading