सावरकर पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता - उद्धव ठाकरे

सावरकर पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता - उद्धव ठाकरे

'जो तुरूंगवास सावरकरांनी 14 वर्षे भोगला तसा तुरूंगवास नेहरूंनी 14 मीनटं जरी भोगला असता तरी मी त्यांना वीर जवाहरलाल नेहरू म्हणालो असतो.'

  • Share this:

उदय जाधव, मुंबई 17 सप्टेंबर : मुंबईत(Mumbai) आज 'सावरकर इकोज फ्राँम ए फरगाँटन पास्ट' ('Savarkar: Echoes from a forgotten past') या विक्रम संपथ (Vikram Sampath) यांच्या पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकी (Loksabha Election)पासूनच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी पर्यंत सावरकर(Vir Savarkar) यांच्या संदर्भात विरोधक ते सत्ताधारी यांच्यात अनेक वाद झालेत. या झालेल्या वादांवर आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसने(Congress) किती ही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. सावरकर देशाचे पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता असं मतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय.

SPECIAL REPORT: 78 वर्षांच्या पवारांची तरुणांनाही लाजवेल अशी फटकेबाजी

उद्धव ठाकरे म्हणाले, आज मराठवाडा मुक्ती दिन. संभाजी नगरचा तिथला खासदार या कार्यक्रमाला आला नाही. तुझा धर्म कुठला म्हणून तू निवडून आला का...? आज आमचा खासदार सावरकरांच्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित आहे. पण तिथला खासदार मराठवाडा मुक्ती दिनाला उपस्थित रहात नाही. तुम्ही मुसलमान म्हणून निवडून आलेला नाहीत असंही त्यांनी इम्जियाज जलील यांना सुनावलं.

'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

ते पुढं म्हणाले, मणिशंकर अय्यर आज जरी समोर दिसले तरी त्यांना जोडे मारले पाहिजेत. राहुल गांधी यांना सध्या बराच वेळ आहे. त्यांना हे सावरकरांचं पुस्तक वाचायला दिलं पाहिजे.  देशाचा पंतप्रधान व्हायच्या आधी त्यांनी देश समजून घेतला पाहिजे. सावरकरांना मुद्दामहून दूर्लक्षित केलं नाही ना असा सवालही त्यांनी केला. जो तुरूंगवास सावरकरांनी 14 वर्षे भोगला तसा तुरूंगवास नेहरूंनी 14 मीनटं जरी भोगला असता तरी मी त्यांना वीर जवाहरलाल नेहरू म्हणालो असतो. सावरकर शिक्षा भोगून मातृभूमीत आले त्यानंतर त्यांची सर्वाधीक अहवेलना करण्यात आली. सावरकरांना भारतरत्नं मिळालंच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 17, 2019, 9:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading