मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'उद्धवजींनी विचार केला तर...' प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण, नेते म्हणाले....

'उद्धवजींनी विचार केला तर...' प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण, नेते म्हणाले....

'शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत काय चालले आहे, याचे चित्र दाखवणारे हे पत्र आहे'

'शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत काय चालले आहे, याचे चित्र दाखवणारे हे पत्र आहे'

'शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत काय चालले आहे, याचे चित्र दाखवणारे हे पत्र आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 20 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना भेटल्यामुळे राज्यातील भाजपमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यातच आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक  (Pratap Saranaiks letter ) यांनी भाजपसोबत जुळवून घ्या, असा सूर लगावल्यामुळे भाजप नेत्यांनी एकच आनंद व्यक्त केला आहे. 'ही शिवसैनिकांची तळमळ आहे' अशी प्रतिक्रिया भाजपमधून उमटत आहे.

प्रताप सरनाईक यांच्या पत्रातामुळे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे.

'अशा कुठल्याही विषयावर सकारात्मक बोलाल तर सामनात छापून येईल.  पोटात गोळा येतोय असं ते म्हणतील. पण उद्धवजींनी विचार केला तर आमचे वरिष्ठ नेते विचार करतील, असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं.

अलर्ट! स्मार्टफोनमध्ये हे 8 Apps असल्यास लगेच करा डिलीट,Googleनेही उचललं हे पाउल

तसंच, '१८ महिन्यापासून हेच घसा कोरडा होईपर्यंत सांगतोय.  बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्या सोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. बाळासाहेबांनी अल्पसंख्याकाचा चांगुलपणावर राजकारण केलं नाही. मान खाली करायची नाही यावर शिवसेनेचे राजकारण होते. पण आता टिपू सुल्तानच्या जयंत्या साजऱ्या करायला लागले' असा टोलाही पाटील यांनी सेनेला लगावला.

तर, 'शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत काय चालले आहे, याचे चित्र दाखवणारे हे पत्र आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे पण तरीही शिवसेनेचे आमदार नाराज आहे,  तळागळातील शिवसैनिक नाराज आहे. त्यांच्यातली खदखद या पत्रातून समोर आली आहे' अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

''आदित्य दादा'', पुण्यातल्या चिमुकल्या गडप्रेमीचं आदित्य ठाकरेंना पत्र

'प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून गांभीर्याने घ्यावे. संजय राऊत शिवसेनेचे खासदार असून शिवसेनेला खड्यात घालण्याचं काम संजय राऊत करत आहे' अशी टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली.

काय म्हणाले प्रताप सरनाईक आपल्या पत्रात?

'गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र, आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत. अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एक विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली का? असा सवाल सरनाईक यांनी उपस्थितीत केला.

नवऱ्यासाठी नाही या गोष्टीसाठी तरुणीनं केलं लग्न?मंडपातील प्रकार पाहून वराती थक्क

तसंच, 'आपण आपल्या पदाला न्याय दिला आहे व देत आहा. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरू आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे' असंही सरनाईक म्हणाले.

मुंबई लोकलबाबत महापौर किशोरी पेडणेकरांचं महत्त्वाचं विधान

'पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.' असंही सरनाईक म्हणाले आहे.

लसीकरणाच्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करायची आहे? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहे, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंजवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही सरनाईक यांनी मांडली.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर