मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : 'बेसावध राहू नका' मुख्यमंत्र्यांनी दिला 'मिनी लॉकडाऊन'चा इशारा

BREAKING : 'बेसावध राहू नका' मुख्यमंत्र्यांनी दिला 'मिनी लॉकडाऊन'चा इशारा

' एक दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका, दररोज 700 मेट्रिक ऑक्सिजन लागला तर...'

' एक दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका, दररोज 700 मेट्रिक ऑक्सिजन लागला तर...'

' एक दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका, दररोज 700 मेट्रिक ऑक्सिजन लागला तर...'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 12 जानेवारी : राज्यात कोरोनाची (corona third wave) तिसरी लाट येऊन धडकली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनचा (omicron) समूह संसर्ग सुद्धा सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात सध्या रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण, एक दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका, दररोज 700 मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील' असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी दिला आहे.

आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्ण वाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली.

(वर्ध्यात कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरातील बाधितांचा आकडा शंभरी पार)

'राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढतो आहे. आता हा वापर दररोज सुमारे 400 मेट्रिक टन इतका वाढला आहे, दररोज 700 मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे तसेच इतर नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले.

मुंबई व इतर प्रमुख शहरांशिवाय आता हळूहळू राज्याच्या ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. आज रुग्णालयात दाखल ज्या रुग्णांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज भासत नाही असे दिसते. युके, अमेरिका या देशांतही आता रुग्णालयांमध्ये संख्या वाढून ताण यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बेसावध राहू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जनतेनं भ्रमात राहू नये, राजेश टोपेंनीही दिला इशार

दरम्यान, 'मी जनतेला सांगेल की, आपण कोणत्या ही भ्रमात राहू नये. आज 45 हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्के आहे आणि मुंबईत २७ टक्के आहे. ८६ टक्के लोक होम क्वारंटाइन आहेत, ४ टक्केमध्ये .९ टक्के आयसीयूमध्ये आहेत, ऑक्सिजन बेडवरती १.८९ टक्के आहे आणि  २.८ गंभीर रुग्ण आहेत, त्यामुळे खबरदारी घेतली पाहिजे, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

(बुमराहचा बदला, विराटला आठवला 'बेन स्टोक्स', सलिल कुलकर्णींना आवडला कॅप्टनचा सूर)

तसंच, लक्षण नसतील आणि त्यांना घरी थांबायचा असेल तर त्यांना घरी थांबू द्या असे आदेश दिले आहेत मात्र सेल्फ टेस्ट केली तर मदत करण्यासाठी तुम्ही जवळच्या केंद्राला कळवा, असं आवाहनही टोपे यांनी केलं.

'लसीकरणासंदर्भात दर कमी होत आहे, तो होता कामा नये, आता लसीकरण कमी झाले आहे, राशन आणि इतर विषय असतील. लोक सगळ्या सुविधा घेत आहेत मात्र लस घेत नाहीत. लस उपलब्ध करण्याच्या संदर्भात मागणी उद्या आम्ही करणार आहोत. अनेक जिल्हाधिकारी यांची मागणी होत आहे, आम्ही ही मागणी केंद्राकडे करणार आहोत, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

First published:

Tags: Corona