...तर भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेत धक्का देणार

...तर भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेत धक्का देणार

सत्ता स्थापन करण्यास शिवसेनेनं साथ दिलं नाही मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून जाऊ शकतं

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई 3 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरुन अजूनही संघर्ष सुरु आहे. राज्यात शिवसेना कुणाला सोबत घेवून सत्ता स्थापन करते यावरुन मुंबई महापालिकेचंही भविष्य अवलंबून आहे. कारण युती तुटू नये म्हणून भाजपनं अडीच वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देवून सत्ता स्थापन करु दिलीय. हे करतांना सत्तेतली कुठलीही पदं भाजपनं स्वत:कडे घेतली नव्हती. आता मात्र शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार केला तर मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातातून जाऊ शकते. भाजप आणि शिवसेनेचं फाटलं तर मुंबई महापालिकेत काय घडू शकते याच्याबद्दल काही शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत.

अशी आहे मुंबई महापालिकेतली स्थिती

शिवसेनेकडे सध्या 84 अधिक 9 अशा 93 जागा आहेत. तर भाजपकडे 84 म्हणजेच भाजपच्या पालिकेत सेनेपेक्षा 9 जागा कमी आहेत. एकहाती सत्तेसाठी भाजपला 115 जागा हव्या आहेत. म्हणजेच भाजपला 31 नगरसेवकांची गरज आहे. महापालिकेत काँग्रेस-29, राष्ट्रवादी-8, सपा-5 एमआयएम-2 आणि मनसे-1 असे नगरसेवक आहेत

शक्यता-1

लवकरच महापौरांची निवडणूक होणार असून भाजप सत्तेची गणितं जुळवून स्वत:चा महापौर बसवू शकते

शक्यता -2

महापौर बसवल्यानंतर मेयर इन काऊंसिल आणून भाजप सत्तेची सर्व सूत्र स्वत:कडे घेवू शकते.

शक्यता- 3

मेयर इन काऊंसिलींग लागू झालं तर शिवसेनेचे मुंबईबाबतचे सगळे महत्वाचे प्रकल्प भाजपं थांबवू शकते

शक्यता -4

भाजपनं शिवसेनेला बीएमसीसाठी दिलेला बाहेरून पाठिंबा काढून घेवून शिवसेनेला अल्पमतात आणू शकते. आणि सेना बहुमत सिद्ध करु शकली नाही. तर इतर पक्षाच्या मदतीने भाजपने सत्ता स्थापन करु शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 05:52 PM IST

ताज्या बातम्या