Home /News /mumbai /

'आदेश दिले असते तर घरी बसलो असतो', फडणवीसांचं सभागृहात मोठं विधान

'आदेश दिले असते तर घरी बसलो असतो', फडणवीसांचं सभागृहात मोठं विधान

ज्या पक्षाने मला सर्वोच्च अधिकार दिले, आज त्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदावर बसण्याचे आदेश दिले मी ते स्विकारलं.

    मुंबई, 04 जुलै : आमच्या नेत्यांनी मला आदेश दिला आणि उपमुख्यमंत्रिपदी बसण्याचे सांगितले.  ज्या पक्षाने मला सर्वोच्च अधिकार दिले, आज त्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदावर बसण्याचे आदेश दिले मी ते स्विकारलं. जर त्यांनी मला घरी बसण्याचे आदेश दिले असते तर मी सुद्धा बसलो असतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर नाराजीबद्दल टीकेला उत्तर दिले. शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी शिंदेंचं कौतुक केलं. आम्ही विरोधी बाकावर होतो पण कधी विचलित झालो नाही. कोरोनाच्या काळातही जनतेमध्ये राहिलो. काही लोक हे आम्हाला म्हणतात की सत्तेसाठी आम्ही आहोत. पण, सामाजिक काम करण्यासाठी सत्ता हवी आहे. पर्यायी सरकार देणार असं म्हटलो होतो. आता नरेंद्र मोदी यांनी ते दाखवून दिले आहे.  आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवला आहे. आमच्या नेत्यांनी मला आदेश दिला आणि उपमुख्यमंत्रिपदी बसण्याचे सांगितले.  ज्या पक्षाने मला सर्वोच्च अधिकार दिले, आज त्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदावर बसण्याचे आदेश दिले मी ते स्विकारलं. जर त्यांनी मला घरी बसण्याचे आदेश दिले असते तर मी सुद्धा बसलो असतो, असंही फडणवीस म्हणाले. मी आता अतिशय स्पष्टपणे सांगतो आज मी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आमच्या  सरकारमध्ये कुरघोडी, शह देण्याचे दिसणार नाही. आमची मैत्री कधीच मोडणार नाही. मी कुणाला उपमा देणार नाही. पण, एवढंच सांगतो जेव्हा धनानंदाची सत्ता जाते त्यावेळी चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ही सत्ता खाली आणावी लागते, हे आता झाले आहे, असंही फडणवीस म्हणाले. शरद पवार यांनी सुद्धा संघ, संघाची शिस्त याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मी संघ सेवक आहेच. मी त्यांचे आभार मानतो. राज ठाकरे यांनी सुंदर पत्र लिहिले, मी त्यांना दुसऱ्या दिवशी उत्तर देणार होतो, पण फोन करून आभार मानले. आता आपण सगळे राजकीय विरोधक आहोत. सगळे मित्र आहे. हे सगळे ईडीमुळेच आले आहे. पण ही ईडी म्हणजे, एकनाथ आणि देवेंद्र आहे, असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या