Home /News /mumbai /

मुंबईत रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान, नाहीतर होऊ शकतो जबर दंड

मुंबईत रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान, नाहीतर होऊ शकतो जबर दंड

मुंबईची लाईफ लाईन समजणारी जाणारी लोकल सेवाही याला अपवाद ठरली नाही.

मुंबईची लाईफ लाईन समजणारी जाणारी लोकल सेवाही याला अपवाद ठरली नाही.

'योग्य चर्चा करून रेल्वे बरोबर बसून मार्ग काढू. अजून एक दिवस उशीर केला तर म्हणून शकतो रेल्वे उशीर करत आहे म्हणून.'

मुंबई 29 ऑक्टोबर: मुंबईत लोकल (Mumbai Local Trains) प्रवासासाठी अनेक गटांना आता परवानगी देण्यात आली आहे. काही विशिष्ट वेळेत सर्वांनाच प्रवासासाठी परवानगी द्या अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली होती. आता रेल्वे त्यावर निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेल्वे पोलिसांना (Railway Police) दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. रेल्वेत मास्क न घालता प्रवास केला तर हा दंड होणार आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणार असाल तर मास्क विसरणार नाही याची काळजी घ्या नाहीतर जबर दंड होऊ शकतो. महापालिकेने यासंदर्भात दंडाची जी तरतूद केली आहे त्यानुसार रेल्वे पोलीस आता दंड आकारू शकणार आहेत. सरकारने अनेकदा सांगूनही प्रवासी मास्कशिवाय प्रवास करत असल्याचं आढळून आल्याने प्रशासनाने ही कडक भूमिका घेतली आहे. मास्क घातला नाही तर 200 रुपये दंडाची तरतूद मुंबई महापालिकेने केली आहे. हा दंड दुप्पट वाढविण्याचाही सरकारचा विचार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम खान यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही आधी जे पत्र दिले ते गर्दी होऊ नये याचा विचार करून पत्र दिले आहे. मुख्य सचिव आज चर्चा करून तोडगा काढतील. योग्य चर्चा करून रेल्वे बरोबर बसून मार्ग काढू. नवीन काही योजना आणायची नाही. रेल्वेचं काही म्हणणं असेल तर विचार करू. अजून एक दिवस उशीर केला तर म्हणून शकतो रेल्वे उशीर करत आहे म्हणून. रेल्वेला चिंता गर्दीची महिला आणि वकीलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर आता सर्वसामान्य प्रवाशांनाही रेल्वे प्रवासाची (Mumbai Local) मुभा मिळावी, अशी विनंती राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाकडे केली होती. आता पश्चिम रेल्वे प्रशासनानं राज्य सरकारच्या पत्राला उत्तर दिलं आहे. मोठी बातमी! दिवाळी सणातील STची हंगामी तिकीट दरवाढ रद्द, सर्वसामान्यांना दिलासा आपली पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेनं लोकल सुरू करण्याची रेल्वेची तयारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, त्याचबरोबर काही प्रश्न देखील रेल्वे प्रशासनानं उपस्थित केले आहेत. प्रत्येक तासाला महिलांसाठी स्पेशल ट्रेन सुरू करणं अशक्य आहे. महिलांसाठी स्पेशल ट्रेन सुरू करणं म्हणजे गरजेपेक्षा जास्त उपलब्धता करून देणं असेल, असं म्हटलं आहे. पूर्वी महिलांसाठी दिवसभरात 10 स्पेशल लोकल ट्रेन धावत होत्या. सध्या 6 ट्रेन धावत आहेत. कोविड-19 पूर्वी दररोज 1367 लोकलच्या फेऱ्या व्हायच्या. त्यातून सुमारे 35 लाख प्रवाशांची ये-जा करत होते. परंतु, आता कोरोनाच्या संकटात पूर्ण क्षमतेनं लोकल चालवल्यास गर्दीचं नियोजन कसं करणार? क्यूआर कोड, टीसी स्टाफ अपुरा पडेल? कोविड काळात पूर्ण क्षमतेने चालवल्या तरी नऊ लाख सहा हजार प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेसकडून नवीन नावं समोर, काहींना मिळणार डच्चू? महिलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकंल चालवल्या तर त्यात पुरुष प्रवासी पण शिरतील त्यांच्यावर नियंत्रण कसे ठेवणार? या शिवाय एकदा सुविधा सुरु केली तर तिला माघारी घेणे म्हणजे मोठ्या टीकेला सामोरं जावं लागेल, असंही रेल्वे प्रशासनानं म्हणलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Indian railway, Mumbai local

पुढील बातम्या