• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • ...तर आपण कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेर पडणार नाही : मुख्यमंत्री

...तर आपण कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेर पडणार नाही : मुख्यमंत्री

"माझा डॉक्टर" या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • Share this:
    मुंबई, 5 सप्टेंबर : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला (Coronavirus third wave) रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या "माझा डॉक्टर" या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे असं मला वाटत. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते हे प्रयत्न आहेत. पाहूयात उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे. तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर... आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात मग आज ही चर्चा कशासाठी, तर कारण स्पष्ट आहे. जगभरातील  देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटु आहे. आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. अमेरिकेचे डॉ. मेहूल मेहता त्यांच्या देशातील स्थितीबाबत बोलणार आहेत. तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत, तर डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत, त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्वाच्या आहेत. रुग्णालयांनी या गोष्टीचे ऑडिट करून घ्यावे अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपण ही सज्‍ज राहिले पाहिजे. लाट ऊंचीवर पोहोचली की श्वास घ्यायला उसंत मिळत नाही. यावेळी आपल्या यंत्रसामग्रीचा वापर वाढतो. ऑक्सिजन असो की रुग्णशय्या, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सगळ्या रुग्णालयांनी या गोष्टीचे ऑडिट करून घ्यावे. आज शिक्षक दिन आहे. शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. शिक्षक कुठे, कधी कसा भेटेल हे सांगता येत नाही. कोरोनाने आपल्याला काय शिकवलं हे मागे वळून पाहण्याची गरज. रस्ता क्रॉस करतांना आपण मागे-पुढे वळून पहातो, रहदारीची काळजी घेतो. तसेच आता आपल्याला कोरोनाचे संकट क्रॉस करून पुढे जायचे आहे. आरोग्य सचिवांनी आपल्याला हा रस्ता कसा क्रॉस करायचा याचेच सादरीकरण केले. आपल्याला सावधपणे पुढे कसे जाता येईल हे सांगितले. राज्याला कोरोनाच्या तिसरी लाटेतून दिलासा?, राज्य सरकारची तयारी पूर्ण ...तर आपण कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेर पडणार नाही ही सगळी काळजी घेतांना अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची  घाई आहे. पण आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही गरज आहे. ती घेतली नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेरच पडणार नाही. यामुळे कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता वाढू शकते. तसे होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज. महाराष्ट्राने ज्या वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तेवढी क्वचितच एखाद्या देशाने केली असावी. पण आजही ऑक्सिजनची आपल्याकडे कमी आहे आपण रोज 3 हजार मे.टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. काही यंत्रसामग्री बाहेरून आणावी लागत आहे, त्यात काही वेळ जाणार आहे. आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहे. आज आपल्याकडे 1.25 लाख ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहे. पण ऑक्सिजन बेड वाढवले म्हणजे आपण या सगळ्या रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकतो का याचा विचार करायला हवा. मागच्यावेळी 80 हजार रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज होती. पण त्यांना पुरेल एवढा ऑक्सिजन आपल्याकडे नव्हता. आपले ऑक्सिजनचे उत्पादन तेव्हा रोज 1200 ते 1300 मे.टन एवढेच होते. त्यावेळी 17000 ते 1800 मे.टन ऑक्सिजनची गरज लागली. इतर राज्यातून हजारो कि.मीहून ऑक्सिजन आणावा लागला. आपली यंत्रणा श्वास रोखून बसली होती. इतर राज्यातून आपण ऑक्सिजनची गरज भागवली. पण त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला त्या राज्यातून ऑक्सिजन मिळत नाही, तो ऑक्सिजन ते राज्य त्यांच्या राज्यातील रुग्णांसाठी वापरतात ही वस्तुस्थिती आहे अशावेळी आपल्या ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे. पंडित नेहरूंशी वैर का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल आज 1400 मे.टन ऑक्सिजनचे उत्पादन राज्यात होत आहे. त्यात स्टील आणि लघु उद्योगासाठी ऑक्सीजन वापरतात. औषधक्षेत्रात, लस तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मागच्यावेळी  सर्वच आपण ऑक्सिजन मेडिकल कारणासाठी वापरला म्हणजे इतर गोष्टींसाठी लागणारा ऑक्सिजन आपण बंद केला. आजही 1400 मे.टन ऑक्सिजनपैकी 300 ते 350 ऑक्सिजन आपण रुग्णांसाठी वापरत आहोत. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ येऊ नये हा आपला प्रयत्न आहे माणूस आजारी पडला की सर्वप्रथम आपल्या फॅमिली डॉक्टरकडे "माझा डॉक्टर" या भावनेतून जातो. कारण त्यांचा या माझा डॉक्टरवर विश्वास असतो. पावसाळा सुरु आहे. डेंग्यु, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज. कोविड नसला तरी डेंग्यु, मलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याची गरज. डेंग्युची लक्षणेही बदलेली दिसतात. दोन्ही डोस घेतले तरी काळजी घ्या लसीचे दोन्ही डोस घ्या. पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरतांना काळजी घ्या, मास्क नक्की लावा. माझा डॉक्टरांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करावी राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी आम्ही राजकारण्यांनीही, राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा. नदीत आंघोळीसाठी गेलेले पाच तरुण बुडाले, नागपुरातील घटना गाव कोरोनामुक्त करावे कोरोनामुक्त गावाची संकल्पना शासनाने राबविली. मला खूप अभिमान आहे की महाराष्ट्रातील अनेक गावांनी यात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त केले. माझे- कुटुंब माझी जबाबदारी ही जशी महत्वाची गोष्ट आहे तशीच माझे गाव माझी जबाबदारी ही गोष्ट ही महत्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन गाव कोरोनामुक्त करावे. आता सणवाराचे दिवस सुरु. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे विषाणुचा रोज नवा अवतार येत आहे आणि जगाला ग्रासून टाकत आहे. वाहतूकीतून कोरोनाचा प्रवास होत आहे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
    Published by:Sunil Desale
    First published: